हिंदू धर्मात जेवढे संत आहेत, पंथ आहेत, संप्रदाय आहेत त्या सर्वांची टिळे लावण्याची पद्धत ही वेग-वेगळी आहे. आज आम्ही तुम्हाला कोणत्या संप्रदायतील व्यक्ती कशा पद्धतीचा टिळा लावतात याबद्दल सांगणार आहोत -
शैव- शैव परंपरेमध्ये ललाटवर चंदनाची आडवी रेषा अथवा त्रिपुंड लावले जाते. साधारण सर्वच शैव साधु याच पद्धतीचा टिळा लावलेले असतात. त्रिपुंड तिलक भगवान शंकराच्या भाग असल्याने जास्तीत जास्त शैव संन्यासी त्रिपुंड लावतात. शैव परंपरेमध्ये ज्यांचे पंथ बदलले जाते जसे अघोरी, कापालिक, तांत्रिक अशा व्यक्तींची तिलक लावण्याची पद्धत त्या त्या पंथ आणि मता नुसार बदलते.
शाक्त- शक्तिचे आराधक तिलकच्या शैलीपेक्षा अधिक तत्वांवर लक्ष देतात. हे साधू चंदन अथवा कुंकवा ऐवजी सिंदूरचा टिळा लावतात. सिंदूर हे उग्रतेचे प्रतीक आहे. तसेच हे साधकाची शक्ति अथवा तेज वाढवण्यास सहायक असल्याचे मानले जाते. अधिकतर शाक्त आराधक कामाख्या देवीच्या सिद्ध सिंदूराचा उपयोग करतात.
वैष्णव- वैष्णवांमध्ये टिळ्याचे सर्वाधिक प्रकार पाहण्यास मिळतात. वैष्णव पंथ हा राम मार्गी आणि कृष्ण मार्गी परंपरेमध्ये वाटला गेलेला आहे. यांचे
आपापले मत, मठ आणि गुरु आहेत. त्यामुळे वैष्णवांमध्ये टिळ्याचे जास्त प्रकार पाहण्यास मिळतात. वैष्णव परंपरेमध्ये 64 प्रकारचे टिळे आहेत. यातील काही प्रमुख टिळ्यांबद्दल आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
लालश्री टिळा - या टिळ्याच्या आजूबाजूला चंदनाची व मध्यभागी कुंकु अथवा हळदीची उभी रेषा असते.
विष्णु स्वामी टिळा - हा टिळा कपाळावर दोन जाड उभ्या रेषांनी लावण्यात येतो.
रामानंद टिळा - विष्णु स्वामी टिळ्याच्यामध्ये कुंकुवाने उभी रेषा लावल्याने रामानंदी टळा तयार होतो.
श्यामश्री टिळा - हा टिळा कृष्ण उपासक वैष्णव लावतात. या टिळ्याच्या आजूबाजूने गोपीचंदन अथवा मध्यभागी काळ्या रंगाची मोठी रेष असते.
इतर टिळे - इतर प्रकारच्या टिळ्यांमध्ये गणपती आराधक, सूर्य आराधक, तांत्रिक, कापालिक इत्यादी प्रकारचे वेगवेगळे टिळे आहेत. यांच्या देखील वेगवेगळ्या उपशाखा आहेत. अनेक साधु व संन्यासी भस्माचा टिळा देखील लावताना दिसतात.