हिंदू पंचांगानुसार प्रत्येक मासातील कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला भगवान श्रीगणेशाच्या संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. या महिन्यात हे व्रत आज (10 नोव्हेंबर, गुरवार) आहे. या दिवशी श्रीगणेशाची विधीव्रत पूजा केल्यास सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात. संकष्ट चतुर्थीचे व्रत खाली सांगितलेल्या विधीनुसार करावे...
- सकाळी लवकर उठून स्नान करून सोवळ्यात व्हा.
- सामर्थ्यानुसार सोने, चांदी, तांब, पितळ किंवा मातीच्या श्रीगणेश मूर्तीची स्थापना करावी.
- संकल्प मंत्रानंतर श्रीगणेशाची पंचोपचार पूजा करून आरती करावी. श्रीगणेशाच्या मूर्तीला शेंदूर अर्पण करावा. गणेश मंत्र ऊं गं गणपतयै नम: चा उच्चार करीत 21 दुर्वा अर्पण करा.
- गुळ किंवा बुंदीच्या 21 लाडूंचा नैवेद्य दाखवावा. यामधील पाच लाडू मूर्तीजवळ ठेवा आणि पाच लाडू ब्राह्मणाला देवून इतर लाडू प्रसाद स्वरुपात वाटा.
- पूजा करताना श्रीगणेश स्तोत्र, अथर्वशीर्ष, संकटनाशक स्तोत्राचे पाठ करावे.
- या व्रताचे श्रद्धा आणि बक्तीने पालन केल्यास श्रीगणेश साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण करतात तसेच जीवनात सदैव यशाची प्राप्ती होते.