Home | Jeevan Mantra | Dharm | scientific reasons behind hindu traditions

या 11 हिंदू प्रथांमागे दडले आहेत विविध वैज्ञानिक तर्क

जीवनमंत्र डेस्क | Update - Oct 09, 2017, 11:57 AM IST

प्राचीन काळापासून चालत आलेल्या काही परंपरांचे पालन आजही अनेक लोक करतात. या परंपरा धर्माशी संबंधित मानल्या जातात

 • scientific reasons behind hindu traditions
  प्राचीन काळापासून चालत आलेल्या काही परंपरांचे पालन आजही अनेक लोक करतात. या परंपरा धर्माशी संबंधित मानल्या जातात, परंतु यामागे वैज्ञानिक कारणेदेखील आहेत. जे लोक या प्रथांचे पालन करतात त्यांना आरोग्याशी तसेच भाग्याशी संबंधित विविध लाभ होतात. येथे जाणून घ्या, कोणत्या 11 परंपरेचे पालन आजही अनेक घरांमध्ये केले जाते.

  लग्न झालेल्या हिंदू महिला भांगात सिंदूर भरतात आणि कपाळावर टिकली, कुंकू लावतात. या सर्व गोष्टी सौभाग्याचे प्रतीक मानल्या जातात. परंतु यामागे वैज्ञानिक कारणसुद्धा आहे. पारंपरिक शेंदूर, कुंकू हे हळद, तुरटी, मर्क्युरी (पारा) आणि हर्बल इंग्रीडेंट्सपासून तयार केले जाते. हे तत्त्व ब्लडप्रेशर कंट्रोल करण्यासोबतच सेक्शुअल ड्राइव्हला ऍक्टिव्ह करतात. यामुळे विधवा महिलांना सिंदूर, कुंकू लावण्यास मनाई आहे. मर्क्युरी (पारा) ला स्ट्रेस रिलिव्हिंग मानले जाते.

  पुढील स्लाईडसवर जाणून घ्या, इतर कोणकोणत्या परंपरांचे आजही पालन केले जाते आणि त्यामागील वैज्ञानिक रहस्य...
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - हात जोडून नमस्कार करणे

  वैज्ञानिक कारण - आपण एखाद्या व्यक्तीला भेटल्यानंतर हात जोडून नमस्ते किंवा नमस्कार करतो. या प्रथेमागे वैज्ञानिक तर्क असा आहे की, नमस्कार करताना सर्व बोटांचा आग्रभाग एकमेकांच्या संपर्कात येतो आणि त्यावर दबाव पडतो. बोटांच्या नसांचा संबंध शरीराच्या सर्व प्रमुख अवयवांशी असतो. अशाप्रकारे बोटांवर दबाव पडल्यामुळे एक्यूप्रेशर (दबाव)चा थेट प्रभाव आपल्या डोळ्यांवर, कानांवर आणि बुद्धीवर पडतो. तसेच नमस्कार केल्यामुळे समोरच व्यक्ती आपल्याला दीर्घकाळापर्यंत स्मरणात ठेवतो. या संदर्भात आणखी एक तर्क असा आहे की, जेव्हा आपण हात मिळवून अभिवादन करतो तेव्हा समोरच्या व्यक्तीच्या हातावरील किटाणू आपल्यापर्यंत पोहचतात. याउलट नमस्कार केल्याने एकमेकांचा शारीरिक स्वरुपात संपर्क होत नाही आणि आजार पसरवणारे व्हायरस आपल्यापर्यंत पोहचत नाहीत.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - पायात जोडवे घालणे
   
  वैज्ञानिक कारण -हिंदू धर्मामध्ये जोडवे घालणे लग्न झालेल्या महिलांची ओळख मानली जाते. पायांत जोडवे आणि अशाप्रकारच्या वस्तू घातल्या तर प्रसूतिवेदना कमी होतात आणि ताप येणे, चक्कर येणे या समस्या निर्माण होत नाहीत असे मानले जाते.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - नदीमध्ये नाणे, पैसे टाकणे

  वैज्ञानिक कारण- प्राचीन काळी नाणे कॉपर(तांब) धातूचे तयार केले जात होते. कॉपर ह्युमन बॉडीसाठी अत्यंत फायदेशीर असते. पाण्याच्या माध्यमातून कॉपर शरीरात पोहोचावे हाच या परंपरेमागचा उद्देश होता. कारण त्याकाळी नद्याच ड्रिंकिंग वॉटरच्या प्रमुख सोर्स होत्या.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - कपाळावर कुंकू लावण्याची प्रथा

  वैज्ञानिक कारण - स्त्रीच्या कपाळावर कुंकू लावले जाते. या प्रथेमागे वैज्ञानिक तर्क असा आहे की, दोन्ही डोळ्यांच्या मध्ये आज्ञा चक्र असते. या चक्रावर कुंकू किंवा गंध लावल्याने आपली एकाग्रता वाढते. मन व्यर्थ गोष्टींचा विचार करत नाही. कुंकू लावताना बोटाचा किंवा अंगठ्याचा जो दबाव पडतो, त्यामुळे कपाळावरील नसांमधील रक्तसंचार व्यवस्थित राहतो. रक्त कोशिका सक्रिय होतात.
 • scientific reasons behind hindu traditions
  कान टोचण्याची परंपरा

  वैज्ञानिक कारण -स्त्री आणि पुरुष दोघांसाठीसुद्धा कान टोचण्याची परंपरा प्राचीन काळापासून चालत आली आहे. परंतु आजच्या काळात पुरुष वर्गामध्ये ही परंपरा मानण्याची सख्या खूप कमी झाली आहे. या प्रथेमागची वैज्ञानिक मान्यता अशी आहे की, यामुळे विचार करण्याची शक्ती वाढते, वाणी चांगली होते. कानापासून डोक्यापर्यंत जाणाऱ्या नसामधील रक्तसंचार नियंत्रित आणि व्यवस्थित राहतो. कान टोचल्यामुळे एक्यूपंक्चरने होणारे आरोग्य लाभही प्राप्त होतात. धार्मिक मान्यतेनुसार यामुळे लहान मुलांना दृष्ट लागत नाही.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - जेवणाची सुरुवात तिखटाने आणि शेवट गोड पदार्थाने

  वैज्ञानिक कारण - धार्मिक कार्यक्रमामध्ये जेवणाची सुरुवात मसालेदार व्यंजनांपासून होते आणि जेवणाचा शेवट मिठाईने होतो. यामागे वैज्ञानिक तर्क असा आहे की, तिखट खाल्ल्याने आपल्या पोटातील पाचन तत्व आणि आम्ल सक्रिय होतात. यामुळे पाचन तंत्र योग पद्धतीने संचालित होते. शेवटी गोड पदार्थ खाल्ल्याने आम्लाची तीव्रता कमी होते यामुळे पोटात जळजळ होत नाही.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - मंदिरात घंटा वाजवणे
   
  वैज्ञानिक कारण - घंटी वाजल्याने माईंड क्लिअर, शार्प होण्यासोबतच एकाग्र होते. आपण घंटा वाजवल्यानंतर जवळपास 7 सेकंद इको साउंड ऐकू येतो. हा ध्वनी आपल्या शरीरातील 7 हीलिंग सेंटरला ऍक्टिव्ह करतो. घंटेच्या आवाजाच्या कंपनाचा आपल्या शरीरावर सकारात्मक प्रभाव पडतो. घंटेच्या आवाजामुळे आपल्या डोक्यातील वाईट विचार संपून जातात आणि आपले विचार शुद्ध बनतात.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - जमिनीवर बसून जेवण
   
  वैज्ञानिक कारण- शास्त्रामध्ये जेवण करताना पाय पसरवून, पालथी मांडी घालून किंवा पाय वर करून बसने निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. कारण पाय ताणून बसल्याने पोटाच्या नसनाड्या व जठरावर ताण पडतो. पोटाचे अवयव ताणलेल्या स्थितीत असताना खाल्याने मंदाग्नी, अपचन, वातप्रकोप यासारखे अनेकानेक पोटाचे आजार होतात. जमिनीवर बसून जेवल्याने तुम्ही या समस्यांपासून दूर राहू शकता. जमिनीवर बसून जेवन केल्‍यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा - दक्षिणेकडे डोके करून झोपणे
   
  वैज्ञानिक कारण - दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने वाईट स्वप्न पडतात. यामुळे उत्तर दिशेकडे पाय करून झोपावे. यामागे वैज्ञानिक तर्क असा आहे की, आपण उत्तर दिशेकडे डोके करून झोपल्यास आपेल शरीर पृथ्वीच्या चुंबकीय तरंगाच्या सानिध्यात येते आणि शरीरातील आयर्न म्हणजे लोह तत्वाकडे हे तरंग प्रवाहित होऊ लागतात. यामुळे मेंदूशी संबंधित एखादा आजार होण्याची शक्यता वाढते. रक्तदाबसुद्धा असंतुलित होऊ शकतो. दक्षिण दिशेला डोके करून झोपल्याने या समस्या निर्माण होत नाहीत.
 • scientific reasons behind hindu traditions
  परंपरा -  सूर्यदेवाची पूजा करणे

  वैज्ञानिक कारण -सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य देऊन नमस्कार करण्याची प्रथा प्राचीन काळापासून चालत आली आहे. या प्रथेमागे वैज्ञानिक तर्क असा आहे की, अर्घ्य देताना पाण्यातून येणारा सूर्यप्रकाश आपल्या डोळ्यांपर्यंत पोहोचल्याने डोळ्यांची शक्ती वाढते. तसेच सकाळचा सूर्यप्रकाश शरीरासाठीसुद्धा खूप चांगला राहतो. शास्त्रानुसार सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने कुटुंब तसेच समाजात मान-सन्मान प्राप्त होतो. कुंडलीतील सूर्यदेवाचे दोष नष्ट होतात.

Trending