आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Secret Mystery Of Death Yamraj Had Opened Himself

काय होते मृत्युनंतर? जाणून घ्या, स्वतः यमदेवाने सांगितलेले हे रहस्य

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असे म्हणतात की, मृत्युनंतर जीवन कोणीही पाहिले नाही. यामुळे मृत्यूशी संबंधित कोणतीही घटना समोर येताच व्यक्ती त्याविषयी जाणून घेण्यास आतुर होतो. मृत्यूशी संबंधित कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. वास्तवामध्ये मृत्यू काय आहे आणि विशेषतः मृत्युनंतर काय होते? हे जाणून घेणे कोणत्याही सामान्य मनुष्यासाठी अवघडच नाही तर अशक्य काम आहे.

प्राचीन हिंदू धर्मशास्त्र कठोपनिषदमध्ये मृत्यू आणि आत्म्याशी संबंधित विविध रहस्य सांगण्यात आले आहेत. याचा आधार बालक नचिकेता आणि यमदेव यांच्यामधील मृत्यूशी संबंधित संवाद आहे. नचिकेताच्या पितृभक्ती आणि आत्मज्ञानाच्या जिज्ञासासमोर मृत्यूचे देवता यमदेव यांनाही झुकावे लागले. बालक नचिकेताशी संबंधित हा प्रसंग न केवळ पितृभक्तीसाठी तर गुरु-शिष्य संबंधासाठीसुद्धा मोठे उदाहरण आहे.

या प्रसंगानुसार, ऋषी वाजश्रवस (उद्दालक) नचिकेताचे वडील होते. प्राचीन काळी त्यांनी विश्वजीत नावाचा एक यज्ञ केला. या यज्ञामध्ये सर्वकाही दान करावे लागते. दान करताना नचिकेताने पाहिले की, आपले वडील स्वस्थ गायी दान न करता कमजोर, आजारी गायी दान करत आहेत. तल्लख बुद्धी आणि सात्विक गुण बालक असलेल्या नचिकेताच्या लक्षात आले की, मुलाच्या प्रेमापोटी त्याचे वडील असे करत आहेत.

मोह दूर ठेवून धर्म-कर्म करून घेण्याच्या उद्द्येशाने नचिकेताने वडिलांना विचारले की, तुम्ही मला कोणाला दान करणार आहात. उद्दालक ऋषींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले, परंतु नाचीकेताचा हट्ट सुरुच होतात. त्याने तोच प्रश्न वारंवार वडिलांना विचारला. यामुळे क्रोधीत ऋषींनी, मी तुला यमदेवाला दान करणार असल्याचे सांगितले. वडिलांचे हे शब्द ऐकून नचिकेता दुःखी झाला परंतु सत्याचे रक्षण करण्यासाठी त्याने मृत्यू दानाचा संकल्प वडिलांकडून पूर्ण करून घेतला.
पुढील स्लाईडवर जाणून घ्या, नचिकेता यमदेवाच्या दरबारात पोहोचल्यानंतर काय घडले...