हिंदू धर्म ग्रंथानुसार श्रावण महिन्यात महादेवाचे दर्शन केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रावण महिन्यात १२ ज्योतिर्लिंगाचे दर्शन करण्याचेही विशेष महत्व आहे. या सर्व ज्योतिर्लिंगांची स्वतःची एक वेगळी विशेषता आहे. या सर्वांमध्ये एकमात्र दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग महाकालेश्वरचा महिमा अनोखा आहे. हे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशाची धर्मिक राजधानी मानण्यात येणार्या उज्जैन शहरात स्थित आहे. येथील लोक भगवान महाकालेश्वरला आपला राजा मानतात. श्रावणात महाकालेश्वरचे दर्शन घेण्याचे विशेष महत्त्व आहे.
देशातील बारा ज्योतिर्लिंगामध्ये केवळ महाकालेश्वरची भस्मारती केली जाते. पाहते 4 ते 6 च्या दरम्यान वादिक मंत्र आणि स्तोत्र पाठामध्ये महादेवाला भस्माने अभिषेक केला जातो.
भगवान महाकालेश्वरचे विविध अद्भुत श्रृंगार भक्तांचे मन मोहून टाकतात. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि पाहा महाकालेश्वरचे विविध अद्भुत श्रृंगार...