आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनि जयंती : या आहेत शनिदेवाच्या रोचक गोष्टी, असे आहे स्वरूप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ज्येष्ठ मासातील अमावास्येला शनी जयंती साजरी केली जाते. या वर्षी 18 मे, सोमवारी शनि जयंती आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला शनिदेवाशी संबंधित काही रोचक गोष्टी सांगत आहोत.


सूर्यदेवाचे पुत्र आहेत शनिदेव -

सर्व नऊ ग्रहांमध्ये शनिदेवाचे स्थान सर्वाधिक महत्त्वपूर्ण आहे. शनीला न्यायाधीशाचे पद प्राप्त आहे. पश्चिम दिशेला यांची स्थापना करून पूजा केली जाते. असे म्हणतात की, ज्या व्यक्तीवर शनीची दृष्टी पडते त्याचे वाईट दिवस चालू होतात. याच कारणामुळे सर्व नऊ ग्रहांमध्ये हा भयभीत करणारा ग्रह मानला जातो. या ग्रहाचा प्रभाव एक राशीवर अडीच वर्ष आणि साडेसातीच्या काळात साडेसात वर्ष राहतो. शनीला सूर्यपुत्र मानले जाते. सूर्यदेवाच्या आदेशाने या ग्रहाची निर्मिती झाले असे मानले जाते. यांना शनैश्चर असेही म्हणतात. पुराणांमध्ये लिहिले आहे की...
छाया शनैश्चरं लेभे सावर्णिं च मनुं तत:।
(श्रीमद् भागवत 6/3/41)
अर्थ- सूर्यदेवाची पत्नी छायापासून शनैश्चर आणि सावर्णी मनु नावाचे दोन पुत्र जन्माला आले. यामुळे सावर्णीच शनीचा भाऊ आहे.


असे आहे शनिदेवाचे स्वरूप -

धर्मग्रंथांमध्ये शनिदेवाच्या स्वरूपाचा असा उल्लेख आहे...
इन्द्रनीलद्युति: शूली वरदो गृध्रवाहन:।
बाणबाणासन्धर: कर्तव्योऽर्कसुतस्तथा॥
मत्स्यपुराण 94/६

अर्थ - शनिदेवाचे शरीर इंद्रनीलमणीसमान आहे. यांचा रंग श्यामवर्ण मानला जातो. शनीच्या मस्तकावर सुवर्णमुकुट शोभित असतो आणि निळे वस्त्र परिधान केलेले असतात. शनिदेवाचे वाहन कावळा आहे. शनिदेवाला चार भुजा (हात) आहेत. एका हातामध्ये धनुष्य, एक हातामध्ये बाण, एक हातामध्ये त्रिशूळ आणि एक हाताची वरमुद्रा आहे.

शनीशी संबंधित इतर रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...