20 फेब्रुवारीला शनि प्रदोषच्या दिवशी पुष्य नक्षत्र येत असून याच दिवशी संयोगाने सौभाग्य योगही आहे. अनेक वर्षांमध्ये एकदा हा योग जुळून येतो.
उज्जैनचे पंचांगकर्ता आणि ज्योतिषाचार्य पं. श्यामनारायण व्यास यांच्यानुसार, प्रदोष आणि पुष्य नक्षत्र प्रत्येक महिन्यात येते, परंतु शनिवारी प्रदोष आणि पुष्य नक्षत्र व सौभाग्य योगाचा संयोग वर्षातून एकदाच जुळून येतो. शुक्रवारी रात्री 2.59 ते शनिवारी पहाटे 4 पर्यंत पुष्य आणि शनिवारी सकाळी 7.15 पासून ते 1.40 पर्यंत सौभाग्य योग राहील. या तिन्ही योगाव्यतिरिक्त या दिवशी विश्वकर्मा, गुरु गोरखनाथ व नित्यानंद जयंतीसुद्धा या दिवसाला आणखी खास बनवत आहे.
शनीची साडेसाती असणाऱ्यांना दिलासा
ज्योतिषाचार्य पं. व्यास यांच्यानुसार सध्या धनु, तूळ आणि वृश्चिक राशीला शनीची साडेसाती आणि मेष, सिंह राशीवर शनिदेवाच्या अडीचकीचा प्रभाव आहे. या पाच राशीच्या लोकांनी शनि प्रदोष आणि पुष्य नक्षत्राच्या योगामध्ये शनिदेवाची पूजा करून ब्राह्मणांना तेलाचे दान केल्यास शनिदोषाचा प्रभाव कमी होईल.
शनि प्रदोष व्रताचा विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...