आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या गावामध्ये घरांना लावले जात नाही कुलूप, शनिदेव करतात रक्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
या शनिवारी शनिश्चरी अमावस्या आहे. या दिवशी शनि मंदिरांमध्ये भक्तांची अलोट गर्दी राहते. शनिवार आणि अमावास्येचा संयोग वर्षभरात दोन-तीन वेळेसच जुळून येतो. शनि अमावस्येच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील शनि शिंगणापूर येथील शनि मंदिराची खास माहिती सांगत आहोत...

भारतामध्ये सूर्यपुत्र शनिदेवाचे अनेक मंदिरे आहेत. यामधील एक प्रमुख मंदिर महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात शिंगणापूर येथे आहे. जगप्रसिद्ध या शनि मंदिराची विशेषता म्हणजे येथील शनिदेवाची पाषाण मूर्ती खुल्या आकाशाखाली उघड्यावरच संगमरवराच्या एक चौथर्‍यावर विराजित आहे. देव आहे पण देऊळ नाही असे या देवाचे वैशिष्ट्य आहे. ही मूर्ती उंचीला पाच फुट नऊ इंच आणि लांबीला एक फुट सहा इंच आहे. शनि शिंगणापूरचे महत्त्व शनिदेवाच्या इतर सर्व मंदिरांपेक्षा वेगळे आहे. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या गावातील लोक घरांना कुलूप लावत नाहीत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, या मंदिराची खास विशेषता...