आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शनिश्चरी अमावस्या आज : या विधीने करा शनिदेवाची पूजा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (18 एप्रिल, शनिवार) अमावस्या आहे. धार्मिक मान्यतेनुसार जो व्यक्ती आजच्या दिवशी शनिदेवाचे व्रत आणि पूजन करतो त्याच्यावर शनिदेवाची कायम कृपा राहते. शनिदेवाची पूजा खालील विधीप्रमाणे करू शकता...

शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर स्नान केल्यानंतर सर्वात पहिले कुलदैवतेचा, गुरु, आणि आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या. सूर्य, नवग्रहांना नमस्कार करून श्रीगणेशाची पूजा करा.

त्यानंतर एका लोखंडाच्या कलशामध्ये मोहरीचे किंवा तिळाचे तेल टाकून त्यामध्ये शनिदेवाची लोखंडाची मूर्ती स्थापन करा आणि त्या कलशाला काळ्या कपड्याने झाकून ठेवा. या कलशाला शनिदेवाचे रूप मानून षोड्शोपचार(आवाहन, स्थान, आचमन, स्नान, वस्त्र, चंदन, अक्षता, फूल, धूप-दीप, यज्ञोपवित(जानव), नैवेद्य,पान, दक्षिणा, श्रीफळ, निरांजन) पूजा करा.
- षोड्शोपचार मंत्र माहिती नसेल तर या मंत्राचा उच्चार करा...
ऊँ शन्नो देवीरभिष्टय आपो भवंतु पीतये।
शंय्योरभिस्त्रवन्तु न:।।
ऊँ शनिश्चराय नम:।।

पूजेमध्ये मुख्यत्वे काळे, निळे गुलाबाचे फुलं, नीलकमल, खिचडी (तांदूळ किंवा मुगाची) अर्पण करा. त्यानंतर खालील मंत्राने क्षमायाचना करा...

नमस्ते कोण संस्थाय पिंगलाय नमोस्तुते।
नमस्ते बभ्रुरूपाय कृष्णाय च नमोस्तुते।।
नमस्ते रौद्रदेहाय नमस्ते चांतकाय च।
नमस्ते यमसंज्ञाय नमस्ते सौरये विभो।।
नमस्ते मंदसंज्ञाय शनैश्चर नमोस्तुते।
प्रसादं कुरूमे देवेशं दीनस्य प्रणतस्य च।।

त्यानंतर पूजा सामग्रीसहित शनिदेवाचे प्रतिक कलश(मूर्ती, तेल, कापड) योग्य ब्राह्मणाला दान करा. अशा प्रकारे पूजा करून दिवसभर उपवास करा आणि यथाशक्ती खालील मंत्राचा जप करा...

ऊँ शं शनिश्चराय नम:।