आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धर्मविचार संकुचित नव्हे, तर व्यापकच!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्माचा इतिहास पाहता तो विकसनशिल दिसून येतो. परंपरागत आचार, रूढी यांची छाननी, नवीन अनुभव, तर्क यांच्याद्वारा सतत चिकित्सा होत राहिली. त्यामुळे निरनिराळ्या कालखंडात निरनिराळ्या अवस्था उदयास आल्या. त्याबरोबर नवीन विचारही सुरू झाले. त्याचा परिणाम पहिल्या अवस्थेत क्रांती होऊन नवीन अवस्थेच्या युगास प्रारंभ झाला.
 
धर्म हा शब्द “धृ’ या धातूपासून निघाला आहे. जो धारण करतो तो धर्म असा त्याचा अर्थ आहे. व्यक्तीचे व समाजाचे धारण, पोषण, रक्षण, समृद्धी, स्वातंत्र्य, अभ्युदय हे ज्याने साध्य होईल तो धर्म. “धारयति इति धर्म:।’ धर्म ही एक अशी गोष्ट आहे की, जिला सर्वमान्य होईल अशा व्याख्येत बांधता येत नाही. जगात स गळ्यात गूढ व सुक्ष्म असे धर्मशास्त्र गणले जाते. त्यामुळे धर्माची सर्वंकष व सर्वगामी व्याख्या करणे फार कठीण आहे. महाभारतात यक्षाने युधिष्ठिरास धर्मनिर्णयाच्या बाबतीत प्रश्न विचारला असताना युधिष्ठिरानेही  शास्त्रवाक्ये ही परस्पविरोधी असल्यामुळे व धर्माचे मूलतत्त्व व धर्मरहस्य अत्यंत गूढ असल्यामुळे महाजन ज्या मार्गाने गेले असतील तोच धर्माचा मार्ग योग्य होय, असे उत्तर दिले आहे. 
 
तर्को प्रतिष्ठ: श्रुतयो विभिन्ना: नैको ऋषिर्यस्य वच: प्रमाणम।
धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गत: स पंथा: ।।
धर्माची व्याख्या सुनिश्चित परिपूर्ण अशा शब्दांत द्यावयाची म्हटले तरी शक्य नाही. कारण धर्म हा शब्द महासागरासारखा व्यापक आहे. त्याला अनेकानेक अर्थछटा लाभलेल्या आहेत. परंतु या सर्व धर्मलक्षणात ज्याचे स्वरूप विधिप्रतिपाद्य असून, जो इष्टार्थाला देतो तो धर्म होय. हे जे महर्षी जैमिनीने केलेले धर्मलक्षण आहे ते परिपूर्ण आणि सम्यक आहे, असे बहुतेक विद्वानांचे म्हणणे आहे. 
 
भारतीय धर्मसंकल्पना कमालीची व्यापक आहे. ती आपण समजतो तशी “उपासना पंथ’ एवढ्याचपुरती मर्यादित नाही. धर्म हा भारतीय तत्त्वचिंतकांनी केंद्रवर्ती पुरुषार्थ मानला आहे. धर्माखेरीज आपणास दुसरी गती नाही. मात्र “धर्म एव हतो हन्ति, धर्मो रक्षति रक्षित:’ आपण धर्मावर आघात केला तर धर्मही आपला घात करतो. आपण धर्माचे रक्षण केले तर धर्म आपले रक्षण करतो, अशी भारतीय विचारवंतांची श्रद्धा होती. असा त्यांचा ठाम सिद्धांत होता. म्हणून धर्मरक्षण, धर्मस्थापना, धर्मचक्रप्रवर्तन हे आपल्या परंपरेचे ब्रीद होऊन बसले आहे. 
 
धर्म हा जीवनाच्या सर्व शाखांशी निगडित आहे. त्यात अनेक प्रेरणा व प्रवृत्ती आहेत. त्यांचा परस्परांना छेद जाता कामा नये. तर त्या परस्परपूरक झाल्या पाहिजेत. मानवाच्या सर्वांगीण विकासाला त्या पोषक ठरल्या पाहिजेत. म्हणून केवळ संकुचित व बहिर्मुख दृष्टीने धर्माचा विचार करणे योग्य नाही. नित्य व नैमित्तिक कर्म, कुळधर्म व देशधर्म, आत्मचिंतन व सगुणोपासना, जातीचे निर्बंध यापैकी प्रत्येक गोष्ट धर्माच्या संपूर्ण चौकटीत नेमकी कुठे बसते याची आपणास बरोबर कल्पना असली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने धर्म समजला असे म्हणता येईल. धर्मविचारात सामान्यत: अध्यात्म, उपासना, नीती व आचारधर्म या चार अंगांचे विवेचन अभिप्रेत असते आणि त्या सर्वांत एकसूत्रीपणा असावा लागतो.

धर्माची लक्षणे अशी...
वेगवेगळ्या शास्त्रकारांनी धर्माची लक्षणे वेगवेगळी केलेली आहेत. त्यातील काही लक्षणे साध्यप्रधान म्हणजे फलांचे निर्णय करणारी व काही साधन-प्रधान म्हणजे इतिकर्तव्यता दर्शवणारी आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...