आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shattila Ekadashi Today Use Sesame In This 6 Works Know Fast Method

षटतिला एकादशी आज : या 6 कामांमध्ये करावा तिळाचा उपयोग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्म ग्रंथानुसार माघ मास पवित्र काळ मानला जातो. या महिन्यात व्रत आणि तप करण्याचे विशेष महत्त्व आहे. या महिन्यात कृष्ण पक्षात येणाऱ्या एकादशीला षटतिला म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू पूजनाचे विधान आहे. यावर्षी ही एकादशी 16 जानेवारी, शुक्रवारी आहे.

षटतिला एकादशीला तिळाचा 6 प्रकारे उपयोग करणे उत्तम फलदायी मानले जाते. जो व्यक्ती जेवढ्या स्वरुपात तिळाचा उपयोग तसेच दान करतो त्याला तेवढे वर्ष स्वर्गामध्ये स्थान प्राप्त होते. षटतिला एकादशीला 6 प्रकारे तिळाचा उपयोग तसेच दान करण्याचे सांगण्यात आले आहे.

शास्त्रामध्ये लिहिण्यात आले आहे की...
तिलस्नायी तिलोद्वार्ती तिलहोमी तिलोद्की।
तिलभुक् तिलदाता च षट्तिला: पापनाशना:।।

अर्थ - या दिवशी पाण्यात तीळ टाकून स्नान करावे, तिळाचे उटणे लावावे, तिळाने हवन करावे, तीळ टाकलेले पाणी प्यावे, तिळाचे भोजन करावे तसेच तिळाचे दान केल्यास सर्व पापांचा नाश होतो. धर्म शास्त्रानुसार षटतिला एकादशीच्या दिवशी पद्मपुराणातील एक कथेचे श्रवण आणि ध्यान करावे. या दिवशी काळे तीळ आणि काळी गाय दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.

षटतिला एकादशीचे व्रत जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...