आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानातील कटासराज मंदिर, महादेवाच्या आश्रुंपासून बनले हे कुंड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाची विविध मंदिरे जगभरात आहेत. यामधील काही मंदिरांचे निर्माण मनुष्यांनी केले आहे तर काही मंदिरे प्राचीन काळापासून स्थित आहेत. महादेवाचे असेच एक मंदिर पाकिस्तानात स्थित आहे. या मंदिराचे नाव आहे कटासराज मंदिर. पाकिस्तानात स्थित असलेले कटासराज शिव मंदिर 900 वर्ष जुने आहे. कटासराज मंदिर पाकिस्तानातील चकवाल गावाजवळून जवळपास 40 किलोमीटर अंतरावर कटस नावाच्या पर्वतावर स्थित आहे. हे मंदिर महाभारत काळातही (त्रेतायुग) होते अशी मान्यता आहे. या मंदिराविषयी पांडवांशी संबंधित विविध कथा प्रसिद्ध आहेत.

कटासराज मंदिर, चकवाल
स्थानिक मान्यतेनुसार, वनवास काळात पांडवानी येथे जवळपास 4 वर्ष वास्तव्य करून या शिवलिंगाची उपासना केली होती. हे मंदिर 900 वर्ष जुने असून मंदिराजवळ एक तलाव आहे. या तलावाशी संबधित एक मान्यता अशी आहे की, सतीने आत्मदहन केल्यानंतर महादेव सतीचे शव घेऊन भ्रमण करत असताना त्यांच्या डोळ्यातून अश्रुंचे दोन थेंब पडले. या अश्रुंपासून दोन कुंड तयार झाले. यामधील एक कुंड भारतातील पुष्कर क्षेत्रामध्ये ब्रह्म कुंड नावाने प्रसिद्ध आहे तर दुसरे कटासराज मंदिराजवळ आहे. या कुंडाचे पाणी दोन रंगाचे आहे. तलावाची खोली कमी असलेल्या पाण्याचा रंग हिरवा असून खोल ठिकाणावरील पाणी निळ्या रंगाचे आहे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्याम पाकिस्तानातील इतर काही प्राचीन शिव मंदिराविषयी....