27 फेब्रुवारीपर्यंत बिल्वपत्राचे / 27 फेब्रुवारीपर्यंत बिल्वपत्राचे हे छोटे-छोटे उपाय केल्यास प्रसन्न होईल लक्ष्मी

Feb 21,2014 11:17:00 AM IST

शिव या शब्दाचा अर्थ आहे कल्याण. भगवान शंकरांना कल्याणकारी म्हटले जाते. ते निराकार व अनादी आहेत. ते सदा सर्वदा सर्वत्र असतात आणि असतील म्हणून त्यांना सदाशिव असेही म्हणतात. सदाशिव म्हणजे सदैव सर्वांचे कल्याण करणारे आहेत, तसेच बेलाचे झाड साक्षात शिव स्वरूप मानले गेले आहे.

महादेवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्र (बेलाचे पान) अर्पण करण्याचे विशेष महत्व आहे. शिव महापुराणातील विद्वेश्वरसंहितेनुसार बेलाचे झाड महादेवाचे रूप आहे. तिन्ही लोकांमध्ये जेवढे पुण्य तीर्थ प्रसिद्ध आहेत, ते संपूर्ण तीर्थस्थळ बेलाच्या झाडाच्या मुळाशी निवास करतात. महादेवाच्या पूजेमध्ये बिल्वपत्र अर्पण केल्यास विशेष फळ प्राप्त होते. 27 फेब्रुवारी गुरुवारी महाशिवरात्री असून 19 फेब्रुवारीपासून शिव नवरात्रीची सुरवात झाली आहे.

पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, बेलाच्या झाडाचे महत्त्व...

- जो व्यक्ती बेलाच्या झाडाजवळ शिव भक्ताला खीर आणि शुद्ध तुपातील अन्नदान करतो त्याला कधीही दारिद्र्याचा सामना करावा लागत नाही. कारण या झाडाला श्रीवृक्ष मानले जाते. म्हणजे यामध्ये देवी लक्ष्मीचा वास आहे. पौराणिक मान्यतेनुसार समुद्रमंथनातून महालक्ष्मी प्रकट झाली आहे. त्यानंतर देव-दानवांमध्ये युद्ध सुरु झाल्यानंतर देवी लक्ष्मीने बेलाच्या झाडामध्ये विश्राम केला होता, यामुळे बिल्वपत्रांनी महादेवाची पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा प्राप्त होते असे मानले जाते. - बेलाचे पान महादेवाला अर्पण केल्यास व्यक्ती सर्व दोष आणि पापातून मुक्त होतो.- जो मनुष्य बेलाच्या झाडाखाली लिंगस्वरूपातील अविनाशी महादेवाची पूजा करतो त्याला निश्चितच शिवपद प्राप्त होते. जो व्यक्ती गंध, फुल वाहून बेलाच्या झाडाची पूजा करतो त्याला शिवलोक प्राप्त होते. - जो व्यक्ती बेलाच्या झाडाजवळ दिवा लावतो, तो तत्वज्ञान संपन्न होतो. बेलाच्या झाडाजवळ महादेवाच्या उपासकाला भोजन दिल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते.
X