आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा हे छोटे-छोटे उपाय, यामुळे वाढू शकते तुमचे उत्पन्न...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देवांचे देव महादेव अत्यंत भोळे असून कोणत्याही भक्ताने भक्तिभावाने त्यांना केवळ एक पाणी अर्पण केले तरी ते प्रसन्न होतात. यामुळेच यांना भोलेनाथ संबोधले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी शिव भक्त महादेवाला प्रसन्न करण्यासाठी विविध उपाय करतात. असेच काही छोटे आणि सोपे उपाय शिवपुराणात सांगण्यात आले आहेत. हे उपाय अगदी सोपे असून सहजतेने केले जाऊ शकतात. प्रत्येक समस्येचे समाधान शिवपुराणात सांगण्यात आले आहे. आज हे उपाय केल्यास भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

उत्पन्न वाढवण्यासाठी
महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची विधिव्रत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा 108 वेळेस जप करावा.
ऐं ह्रीं श्रीं ऊं नम: शिवाय: श्रीं ह्रीं ऐं
प्रत्येक मंत्रोच्चारासोबत पारद शिवलिंगावर एक बेलाचे पान अर्पण करावे. बिल्वपत्राच्या तीन पानांवर क्रमशः ऐं, ह्री, श्रीं लिहावे. शेवटचे 108 वे बेलाचे पान शिवलिंगावर अर्पण केल्यानंतर काढून घ्यावे आणि देवघरात ठेवावे. दररोज या पानाची पूजा करावी. हा उपाय केल्याने उत्पनात वाढ होऊ शकते असे मानले जाते.
बातम्या आणखी आहेत...