आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

श्राद्धाचे भोजन करून पितरांना झाला होता रोग, जाणून घ्या रोचक गोष्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्राद्ध पक्ष संदर्भात विविध धर्म ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. महाभारतातील अनुशासन पर्वामध्ये भीष्म पितामह यांनी युधिष्ठीरला श्राद्ध पक्ष संदर्भात अशा गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या वर्तमानात फार कमी लोकांना माहिती असाव्यात. येथे जाणून घ्या, श्राद्ध पक्ष संदर्भातील काही खास आणि महत्त्वाच्या गोष्टी...

- महाभारतानुसार सर्वात पहिले श्राद्धाचा उपदेश महर्षी निमि यांना महातपस्वी अत्री मुनींनी दिला होता. अशा प्रकारे सर्वात पहिले निमि ऋषींनी श्राद्ध करण्यास सुरुवात केली. त्यानंतर इतर ऋषीं श्राद्ध करू लागले. हळूहळू चारही वर्णाचे लोक श्राद्धामध्ये पितरांना अन्न देवू लागले. नियमित श्राद्धाचे भोजन करून देवता आणि पितर तृप्त झाले.

- श्राद्धाचे वारंवार भोजन करून पितरांना अजीर्ण रोग झाला आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला. तेव्हा ते ब्रह्मदेवाकडे गेले आणि त्यांनी सांगितले की, श्राद्धाचे अन्न खाऊन-खाऊन आम्हाला अजीर्ण (अपचन) झाले असून आम्हाला यामुळे त्रास होत आहे. आम्हाला या त्रासामधून मुक्त करा.

- देवतांचे म्हणणे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले की, माझ्याजवळ अग्निदेव बसलेले आहेत, हेच तुमचे कल्याण करतील. अग्निदेव देवता आणि पितरांना म्हणाले की, आता श्राद्धामध्ये मीसुद्धा तुमच्यासोबत भोजन करेल. मी सोबत असल्यामुळे तुम्हाला अजीर्ण होणार नाही. हे ऐकून देवता प्रसन्न झाले. यामुळे श्राद्ध करताना सर्वात पहिले अग्नीला भाग दिला जातो.

श्राद्ध पक्षाशी संबंधित इतर रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)