आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विचित्र परंपरा : या मंदिरात पती-पत्नी जोडीने घेऊ शकत नाहीत देवीचे दर्शन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिमाचल प्रदेश आपल्या सौंदर्यामुळे जेवढे प्रसिद्ध आहे तेवढेच येथील परंपरांमुळेसुद्धा. आज आम्ही तुम्हाला येथील एका विचित्र प्रथेची माहिती देत आहोत. शिमला जिल्ह्यातील रामपूर नावाच्या गावामध्ये दुर्गा देवीची एक मंदिर आहे. या मंदिरात पती-पत्नी जोडीने दुर्गा पूजन आणि दर्शन करू शकत नाहीत.

हिंदू संस्कृतीमध्ये पती-पत्नीने सोबत पूजा करणे मंगलकारी मानले जाते परंतु रामपूर येथील देवी मंदिरात असे करणे वर्ज्य आहे. जर एखाद्या दाम्पत्याने मंदिरात जाऊन जोडीने दर्शन घेतले तर त्यांना याची शिक्षा भोगावी लागते. हे मंदिर श्राईकोटी नावाने संपूर्ण हिमाचल प्रदेशमध्ये प्रसिद्ध आहे. येथे येणारे प्रत्येक दाम्पत्य वेगवेगळ्या वेळी देवीचे दर्शन घेतात.

या कारणामुळे आहे ही प्रथा -
येथील स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, महादेवाने आपले दोन्ही मुलं श्रीगणेश आणि कार्तिकेय यांना ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्यास सांगितले. कार्तिकेय त्यांच्या वाहनावर बसून ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालण्यासाठी निघून गेले, परंतु श्रीगणेशाने आई-वडिलांना प्रदक्षिणा घालून तुमच्या चरणाजवळच ब्रह्मांड असल्याचे सांगितले. काही काळानंतर कार्तिकेय ब्रह्मांडाला प्रदक्षिणा घालून परत येईपर्यंत श्रीगणेशाचे लग्न झाले होते. या कारणामुळे कार्तिकेय यांना खूप राग आला आणि त्यांनी कधीही लग्न न करण्याचा संकल्प घेतला. श्राईकोटी मंदिराच्या दरवाजांवर आजही श्रीगणेश सपत्निक स्थापित आहेत. कार्तिकेय यांनी लग्न न करण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे देवी पार्वतीला खूप दुःख झाले. त्यानंतर देवी पार्वतीने सांगितले की, जे दाम्पत्य येथे त्यांचे दर्शन घेण्यासाठी एकत्रित येईल ते विभक्त होतील. याच कारणामुळे आजही येथे दाम्पत्य जोडीने देवीचे दर्शन घेत नाहीत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, या मंदिराचे काही खास फोटो...