आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Jyothirlinga, India S 12 Jyothirlinga, Lord Shiva, Sawan Month, Twelve Jyotirlinga

श्रावणात घ्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन, फक्त एका क्लिकवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
15 ऑगस्ट, शनिवारपासून महादेवाच्या भक्तीचा महिना श्रावण सुरु झाला असून आज पहिला श्रावणी सोमवार आहे. धर्मग्रंथानुसार या महिन्यात महादेवाची पूजा करण्याचे विशेष महत्त्व आहे. श्रावणात महादेवाच्या प्रमुख मंदिरांमध्ये दर्शन घेण्यासाठी भक्तांची अलोट गर्दी होते. भारतामध्ये 12 प्रमुख ज्योतिर्लिंग असून प्रत्येकाचे विशेष महत्त्व आहे.

शास्त्रानुसार श्रावण महिन्यात महादेवाच्या ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेतल्यास आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतात. याच कारणामुळे भारतातील प्रमुख 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्यासाठी भाविकांची गर्दी होते. श्रावणाच्या या पवित्र महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवारी जीवनमंत्र आपल्या वाचकांसाठी घरबसल्या 12 ज्योतिर्लिंगांचे दर्शन करण्याची संधी उपलब्ध करून देत आहे.

1. सोमनाथ
सोमनाथ ज्योर्तिंलिंग हे भारतातीलच नव्हे तर जगातील पहिले ज्योर्तिंलिंग आहे. हे मंदीर गुजरातमधील सौराष्ट्रात वसलेले आहे. चंद्राला जेव्हा दक्ष प्रजापतीने शाप दिला होता तेव्हा चंद्राने याच ठिकाणी तपस्या करुन शापातून मुक्ती मिळवली होती.या ज्योर्तिंलिंगाची स्थापना चंद्रदेवाने केली होती, अशीही आख्यायिका आहे. परकीय आक्रमनामुळे 17 वेळा हे मंदीर उद्‍धवस्त झाले आणि परत बांधण्यात आले.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या 12 ज्योतिर्लिंगांचा महिमा...