धर्म शास्त्रानुसार सप्तमी तिथीचे स्वामी सूर्यदेव आहेत. यामुळे या तिथीला सूर्यदेवाची उपासना करावी. श्रावण मासातील शुक्ल पक्षातील सप्तमी तिथी (21 ऑगस्ट, शुक्रवार) ला भगवान शिव आणि सूर्यदेवाची संयुक्तपणे पूजा करण्याचे विधान आहे.
या दिवशी सकाळी लवकर उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे तसेच लाल रंगाचे फुल अर्पण करावे. त्यानंतर महादेवाची विधीपूर्वक पूजा करून धोत्र्याचे फुल आणि बेलाचे पान अर्पण करावे. अशाप्रकारे पूजा केल्यास सर्व रोगांचा नाश होतो. नियमितपणे या विधीने पूजा केल्यास बळ, बुद्धी, वीर्य आणि तेजामध्ये वृद्धी होते.