आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : श्रीकृष्ण भक्तीचा आविष्कार 'रासक्रीडा'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संसारात मानवाला अनेकविध कृती कराव्या लागतात; मात्र त्या करीत असताना त्यांचे पर्यवसान भगवंताच्या भक्तीत झाले पाहिजे. हेच निरनिराळ्या पद्धतीने भागवतात पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. माहात्म्य ज्ञानपूर्वक आणि सर्वांपेक्षा जास्त स्नेह ठेवणे म्हणजे भक्ती होय. म्हणजे संसारात आपण ज्यांच्यावर आणि जेवढे प्रेम करतो त्यापेक्षा जास्त प्रेम जेव्हा आपण भगवंतावर करू लागतो, तेव्हा आपल्या अंध भक्तीचे डोळस भक्तीत रूपांतर होते आणि एकदा का डोळस भक्ती करता आली की ती भक्ती श्रेष्ठ ठरते.

कारण अंध भक्ती क्षीण असते. ‘माहात्म्य ज्ञानपूर्वक स्नेह म्हणजे भक्ती’ अशी भक्तीची व्याख्या केली जाते. ज्याची भक्ती करायची तो सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे, याचे ज्ञान झाले की, ती भक्ती चिरकाल टिकते.