आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ramcharitmanas Shri Ram And Laxman Talking About Good And Man Person

स्त्री असो किंवा पुरुष, अशा लोकांना घाबरवूनच करून घ्यावे लागते काम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या जवळपास अनेक लोक असतात आणि प्रत्येकाचा स्वभाव वेगवेगळा असतो. यामुळे एखाद्या स्त्री किंवा पुरुषाशी आपण कोणत्या विषयावर चर्चा करू नये याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. जर आपण एखाद्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेतला आणि त्याच्यासोबत त्याच्या कामाशी संबंधितच चर्चा केली तर संवाद साधने सोपे होते. येथे श्रीरामचरितमानस ग्रंथानुसार जाणून घ्या, आपण कोणत्या स्त्री आणि पुरुषाशी कोणत्या विषयावर चर्चा करू नये...

श्रीराम म्हणतात -
लछिमन बान सरासन आनू। सोषौं बारिधि बिसिख कृसानू।।
सठ सन बिनय कुटिल सन प्रीती। सहज कृपन सन सुंदर नीती।

मूर्ख म्हणजे जड बुद्धी असणार्‍या लोकांना प्रार्थना, विनंती करू नये.

श्रीराम लक्ष्मणाला म्हणतात - हे लक्ष्मण! धनुष्यबाण घेऊन ये, मी अग्नी बाणाने समुद्राला आटवून टाकतो. एखाद्या मुर्खाशी विनयच्या गोष्टी करू नयेत. कोणताही मूर्ख व्यक्ती इतरांच्या प्रार्थना, आग्रहाला, विनंतीला समजू शकत नाही, कारण त्याची जड बुद्धी असते. मूर्ख लोकांना घाबरवूनच त्यांच्याकडून काम करून घेतले जाऊ शकते.

पुढे जाणून घ्या, आणखी कोणकोणत्या लोकांशी कोणकोणत्या विषयांवर चर्चा करू नये...