आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अठरापगड जातींना सामावून घेणारा श्री सखाराम महाराज यात्राेत्सव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शके १७३९ मध्ये (इसवी सन १८१७) पुण्यातील लोखंडे या भक्ताने सखाराम महाराजांना श्री विठ्ठल पंचायतनाच्या मूर्ती दिल्या. महाराज मूर्ती घेऊन अमळनेरला आले. अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर वैशाख शुद्ध १४ शके १७३९ (सन १८१७) ला देवाची स्थापना झाली. एक वर्षानंतर वैशाख शुद्ध तृतीया ते चतुर्दशी असा उत्सव सुरू झाला, त्यानिमित्ताने...
 
महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर महाराजांनी अद्वैतयुक्त भक्तिमार्गाचा पाया घातला. रामानुजांचा ‘विशिष्टाद्वैत’ हा स्वतंत्र पंथ आहे. वेद व्यासांनी प्रकट केलेला अद्वैत सिद्धांत आद्य शंकराचार्यांनी शुद्ध ज्ञान मीमांसा रूपात प्रसारित केला. हा मूळ सिद्धांत सामान्य जनांमध्ये व्यवहारात आणण्यासाठी रामानुजाचार्यांनी अद्वैतास सगुण भक्तीची जोड दिली आणि हा नवीन सिद्धांत ‘विशिष्टाद्वैत’ म्हणून पुढे आणला. त्यात ज्ञानमार्गाला भक्तिमार्गाची जोड दिली आणि त्यात सर्व जाती-धर्मांच्या लोकांना सामावून घेतले. ‘जगत हे ब्रह्मरूप आहे,’ हा या सिद्धांताचा मूळ विचार. रामानुजाचार्यांची ही परंपरा पुढे बैरागी म्हणून प्रकट झाली. संत काशीराम महाराज, उद्धव महाराज, संत चिंतामणी, मुरारी पंडित (काशी), लक्ष्मीकांत महाराज आणि संत सखाराम महाराज अशी ही परंपरा. सखाराम महाराजांनी वारकरी-वैष्णव आणि बैरागी असा त्रिवेणी संगम घडवला. त्यांनी अमळनेर येथे राही-रखुमाबाई-विठोबा, गरूड, हनुमंत अशी श्री विठ्ठल पंचायतनाची स्थापना केली. सखाराम महाराजांपासून सुरू झालेली ही परमार्थाची गंगा त्यांच्यानंतर गादीवर आलेल्या सत्पुरुषांनी वाहती ठेवली आहे.   

संत सखाराम महाराज अमळनेरला असताना नेहमी भजन-कीर्तन होत असे. महाराज पंढरपूरला गेले की  भक्तांना भजन-कीर्तनाविना करमत नसे. वाडी परिसरात एखादे मंदिर असावे, अशी सर्वांची इच्छा होती. नंतर पुण्यातील लोखंडे या भक्ताने सखाराम महाराजांना शके १७३९ मध्ये (इसवी सन १८१७) श्री विठ्ठल पंचायतनाच्या मूर्ती दिल्या. महाराज मूर्ती घेऊन अमळनेरला आले. त्यामुळे भक्तांच्या आनंदाला पारावार उरला नाही. शके १७४० च्या अक्षय्यतृतीयेला मुहूर्त करून वैशाख शुद्ध १४ शके १७३९ (सन १८१७) ला देवाची स्थापना झाली. एक वर्षानंतर वैशाख शुद्ध तृतीया  ते चतुर्दशी असा प्रथम दिनाचा उत्सव साजरा झाला. भजन, कीर्तन, अन्नदान, दानधर्म मोठ्या प्रमाणात झाले. चतुर्दशीला ‘सर्वांचे भोजन झाले का?’ असे विचारून महाराजांनी स्वत: प्रसाद ग्रहण केला. नंतर त्यांनी तृप्त मनाने वैकुंठागमन केले. 
- अमळनेरकर महाराज सेवा संघ, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...