आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Shukra Pradosh Tomorrow Do The Fast From This Easiest Method And Fulfilled

शुक्र प्रदोष उद्या : या विधीनुसार करा व्रत, पूर्ण होतील सर्व इच्छा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भगवान महादेव आपल्या भक्तांना सर्व सुख प्रदान करतात. प्रत्येक मासातील दोन पक्षांच्या त्रयोदशी तिथीला महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रदोष व्रत केले जाते. हे व्रत विविध वारांच्या संयोगाने वेगवेगळे फळ प्रदान करते. 19 डिसेंबर, शुक्रवारी शुक्र प्रदोष योग जुळून येत आहे. धर्म ग्रंथानुसार शुक्र प्रदोष व्रत केल्याने धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष प्राप्ती होते. आज आम्ही तुम्हाला शुक्र प्रदोष व्रताची माहिती देत आहोत. एखाद्या ब्राह्मणाद्वारे हे व्रत करून घेणे श्रेष्ठ राहते.
या विधीनुसार करा शुक्र प्रदोष व्रत

- पाणी न पिता प्रदोष व्रत करावे लागते. सकाळी स्नान केल्यानंतर महादेव, पार्वती आणि नंदीला पंचामृताने अभिषेक केल्यानंतर बिल्वपत्र, गंध, अक्षता, फुल, पान, सुपारी, लवंग किंवा विलायची अर्पण करून पूजा करावी.

- संध्याकाळी पुन्हा स्नान करून महादेवाची पंचोपचार पूजा करावी.

- आठ दिशेला आठ दिवे लावावेत. दिवा लावताना शिव स्तोत्र, मंत्रांचे स्मरण करावे. महादेवाला शुद्ध तूप आणि साखरेपासून तयार केलेल्या पदार्थाचा नैवेद्य दाखवावा.

- रात्री जागरण करावे.

- अशा प्रकारे सर्व इच्छापूर्तीसाठी आणि अडचणीतून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत करणार्‍या व्यक्तीने धार्मिक विधान आणि नियमांचे पालन करावे.