आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Simhastha Ujjain Know Secrets Thing About Naga Sadhus

येथे बनणार हजारो \'खुनी नागा\', वाचा यांच्या जगातील काही खास गोष्टी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेश राज्यातील उज्जैन येथे 22 एप्रिल ते 21 मे या काळत सिंहस्थ महाकुंभ आहे. जगातील सर्वात मोठ्या या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी लाखो साधू-संत पोहोचले आहेत. सिंहस्थचे पहिले शाही स्नान चैत्र पौर्णिमा (22 एप्रिल)ला आहे. या दिवशी 7 शैव आणि 3 वैष्णव आखाड्याचे हजारो साधूंची नागा बनण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. या नागा साधूंना 'खुनी नागा' संबोधण्यात येईल.

का म्हणतात खुनी नागा?
आखाड्यांच्या नियमानुसार केवळ हरिद्वार आणि उज्जौन येथे आयोजित कुंभमध्ये नागा साधुंना दीक्षा दिली जाते. हरिद्वारमध्ये ज्यांना दीक्षा दिली जाते, त्यांना बर्फानी नागा म्हणतात तर उज्जैन येथे दीक्षा घेतलेल्या साधूंना खुनी नागा म्हणतात. खुनी नागाचा अर्थ धर्म रक्षणासाठी हे साधू आपले रक्त सांडायलासुद्धा मागेपुढे पाहत नाहीत. नागा साधूंना एखाद्या सैन्याप्रमाणे तयार केले जाते.

कसे बनतात नागा साधू?
एक सामान्य व्यक्तीपासून नागा साधू बनण्याचा मार्ग अत्यंत कठीण आणि आव्हानांनी भरलेला असतो. नागा साधू बनण्यापूर्वी स्वतःचे पिंडदान करावे लागते. वास्तवामध्ये प्रत्येक आखाड्याचे दीक्षा देण्यावुर्वी काही नियम आहेत, परंतु काही नियम सर्व दशनामी आखाड्यांमध्ये सारखे आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, नागा साधू बनण्यापूर्वी कोणकोणत्या नियमांचे पालन करणे किती आवश्यक आहे...