आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीता अष्टमी : येथूनच केले होते रावणाने देवी सीतेचे हरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गुरुवार, 12 फेब्रुवारीला सीता अष्टमी आहे. त्रेतायुगात या तिथीला पृथ्वीमधून देवी सीता प्रकट झाली होती. या निमित्ताने येथे जाणून घ्या, पंचवटीशी संबंधित काही खास गोष्टी. याच ठिकाणाहून रावणाने सीतेचे हरण केले होते.

(फोटो- पंचवटी क्षेत्रामध्ये त्या काळाशी संबंधित मोठ-मोठ्या मूर्ती लावण्यात आल्या आहेत)

त्रेतायुगात जेव्हा रावणाने सीतेचे हरण केले होते, तेव्हा श्रीराम, लक्ष्मण आणि देवी सीतेचे पंचवटी क्षेत्रामध्ये वास्तव्य होते. पंचवटी क्षेत्र महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यात आहे. नाशिकमध्ये बारा ज्योतिर्लिंगामधील एक त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग स्थित आहे. प्राचीन काळी पंचवटीला दंडकारण्य स्वरुपात ओळखले जायचे. श्रीरामचरीतमानसमध्ये याचा उल्लेख आहे. श्रीराम, लक्ष्मण आणि देवी सीतेचे पंचवटीमध्ये वास्तव्य असताना त्याठिकाणी रावणाची बहिण शूर्पणखा पोहोचली.

या ठिकाणीच लक्ष्मणाने शूर्पणखाचे कापले होते नाक
शूर्पणखा, श्रीराम आणि लक्ष्मणाला पाहून त्यांच्यावर मोहित झाली होती. सुंदर वेश धारण करून तिने श्रीराम आणि लक्ष्मणासमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. श्रीराम आणि लक्ष्मणाने या प्रस्तावाचा स्वीकार केला नाही परंतु खूप समजावल्यानंतरही शूर्पणखा तयार झाली नाही. शेवटी तिने राक्षसी रूप धारण केले, तेव्हा लक्ष्मणाने तिचे नाक कापले. या अपमानाचा बदला घेण्यासाठी शूर्पणखा तिच्या भावाकडे म्हणजे रावणाकडे गेली. शूर्पणखाने रावनासमोर सीतेच्या सौंदर्याचे खूप कौतुक केले, यामुळे रावणाच्या मनात कामभाव जागृत झाला. रावण दंडकारण्यात पोहोचला आणि वेश बदलून त्याने सीतेचे हरण केले.

प्रचलित मान्यतेनुसार, याठिकाणी लक्ष्मणाने सीतेच्या रक्षणासाठी ओढलेल्या लक्षण रेषेचे स्थानही आहे. या क्षेत्रामध्ये त्याकाळात घडलेल्या घटनांशी संबंधित मोठमोठे शिल्प उभारण्यात आले आहेत.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, पंचवटी क्षेत्राचे काही खास फोटो....