आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीता अष्टमी आज : या विधीने करा देवी सीतेचे पूजन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाल्गुन मासातील शुक्ल पक्ष अष्टमी तिथीला सीता अष्टमी साजरी केली जाते. निर्णय सिंधूच्या कल्पतरू ग्रंथानुसार याच दिवशी जमिनीतून देवी सीता प्रकट झाली होती. आणखी एका मान्यतेनुसार देवी सीतेचा जन्म वैशाख शुक्ल नवमीला झाला होता. यावर्षी सीता अष्टमी 12 फेब्रुवारी गुरुवारी आहे. या दिवशी देवी सीतेचे विशेष पूजन करणे आवश्यक आहे. येथे जाणून घ्या, पूजा विधी...

सीता अष्टमीच्या दिवशी व्रत करणाऱ्या व्यक्तीने सकाळी लवकर उठून स्नान करून व्रत, पूजेचा संकल्प घ्यावा. त्यानंतर चौरंगावर श्रीराम, देवी सीता, वडील जनक, आई सुनयना, कुळ पुरोहित शतानंद, नांगर आणि पृथ्वीची प्रतिमा स्थापन करून पूजा करावी.

सर्वात पहिले भगवान श्रीगणेश आणि जगदंबेचे पूजन करून देवी जानकीची पूजा करावी. पूजा करताना सर्वात पहिले खालील ध्यान मंत्राचा उच्चार करावा...

देवी सीतेचे ध्यान....
ताटम मण्डलविभूषितगण्डभागां,
चूडामणिप्रभृतिमण्डनमण्डिताम्।
कौशेयवस्त्रमणिमौक्तिकहारयुक्तां,
ध्यायेद् विदेहतनयां शशिगौरवर्णाम्।।

वडील जनकाचे ध्यान...
देवी पद्मालया साक्षादवतीर्णा यदालये।
मिथिलापतये तस्मै जनकाय नमो नम:।।

आई सुनयनाचे ध्यान....
सीतााया: जननी मातर्महिषी जनकस्य च।
पूजां गृहाण मद्दतां महाबुद्धे नमोस्तु ते।।

कुळ पुरोहित शतानंदजी यांचे ध्यान...
निधानं सर्वविद्यानां विद्वत्कुलविभूषणम्।
जनकस्य पुरोधास्त्वं शतानन्दाय ते नम:।।

नांगराचे ध्यान....
जीवनस्यखिलं विश्वं चालयन् वसुधातलम्।
प्रादुर्भावयसे सीतां सीता तुभ्यं नमोस्तु ते।।

पृथ्वीचे ध्यान...
त्वयैवोत्पदितं सर्वं जगतेतच्चराचरम्।
त्वमेवासि महामाया मुनीनामपि मोहिनी।।
त्वदायत्ता इमे लोका: श्रीसीतावल्लभा परा।
वंदनीयासि देजवानां सुभगे त्वां नमाम्यहम्।।

त्यानंतर पंचोपचार (स्नान, वस्त्र, फुल, सुगंधित द्रव्य, नैवेद्य) पूजा करावी. शेवटी खालील मंत्राने आरती करावी...

कदलीगर्भसम्भूतं कर्पूरं च प्रदीपितम्।
आरार्तिक्यमहं कुर्वे पश्य मे वरदा भव।।
परिकरसहित श्रीजानकीरामाभ्यां नम:।
कर्पूरारार्तिक्यं समर्पयामि।।