आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या वेळी किती होते देवी सीतेचे वय, तुम्हाला माहिती नसतील या गोष्टी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज ( 4 मे, गुरुवार) सीता नवमी आहे. धर्म ग्रंथानुसार या दिवशी देवी सीतेचा जन्म झाला होता. या दिवसाला जानकी नवमी असेही म्हणतात. वाल्मिकी रामायणामध्ये देवी सीतेशी संबंधित विविध रोचक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टी अनेक लोकांना कदाचित माहिती नसाव्यात. आज सीता नवमीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगत आहोत...

1. श्रीरामाशी लग्न करतना देवी सीतेचे वय केवळ सहा वर्षांचे होते. याचा पुरावा वाल्मिकी रामायणातील अरण्यकांडमध्ये आढळून येतो. या प्रसंगात देवी सीता, साधू रुपात आलेल्या रावणाला आपला परिचय अशा स्वरुपात देते...

श्लोक
उषित्वा द्वादश समा इक्ष्वाकूणां निवेशने।
भुंजना मानुषान् भोगान् सर्व कामसमृद्धिनी।1।
तत्र त्रयोदशे वर्षे राजामंत्रयत प्रभुः।
अभिषेचयितुं रामं समेतो राजमंत्रिभिः।2।
परिगृह्य तु कैकेयी श्वसुरं सुकृतेन मे।
मम प्रव्राजनं भर्तुर्भरतस्याभिषेचनम्।3।
द्वावयाचत भर्तारं सत्यसंधं नृपोत्तमम्।
मम भर्ता महातेजा वयसा पंचविंशक:।
अष्टादश हि वर्षाणि मम जन्मनि गण्यते।।

अर्थ- देवी सीता सांगते की, लग्नानंतर 12 वर्षापर्यंत इक्ष्वाकु वंशी महाराज दशरथ यांच्या महालात राहून मी माझ्या पतीसोबत सर्व मनोवांच्छित भोग भोगले आहेत. मी तेथे सुख-सुविधांचा उपभोग घेऊन संपन्न वास्तव्य केले आहे.

तेराव्या वर्षाच्या सुरुवातीला महाराज दशरथ यांनी दरबारातील सर्वांच्या सल्ल्याने श्रीरामचंद्राचा युवराज पदावर अभिषेक करण्याचा निश्चय केला. तेव्हा कैकयीने माझ्या सासऱ्याला शपथ देवून वचनबद्ध केले आणि दोन वर मागितले. माझे पती (श्रीराम) यांना वनवास आणि भरतचा राज्याभिषेक. वनवासाला जाताना माझ्या पतीचे वय 25 वर्षांचे होते आणि माझ्या जन्मकाळापासून वनगमनापर्यंत माझे वय वर्ष गणनेनुसार 18 वर्षांचे होते. या प्रसंगावरून दिसून येते की, लग्नानंतर देवी सीता 12 वर्षांपर्यंत आयोध्येत राहिल्या आणि वनवासात जाताना त्यांचे वय 18 वर्षांचे होते. यावरून हे स्पष्ट होते की, लग्नाच्या वेळी देवी सीता सहा वर्षांच्या होत्या. तसेच श्रीराम आणि देवी सीता यांच्या वयात सात वर्षांचे अंतर होते.

देवी सीतेशी संबंधित इतर काही खास गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...