आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज सीता नवमी : अशी प्रकट झाली होती जानकी, या विधीने करा पूजन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैशाख मासातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला सीता नवमी म्हणतात. धर्मग्रंथानुसार याच दिवशी देवी सीता प्रकट झाली होती. या तिथीला जानकी नवमी असेही म्हणतात. या वर्षी ही तिथी 27 एप्रिल, सोमवारी आहे.

शास्त्रानुसार वैशाख मास शुक्ल पक्षातील नवमी तिथीला पुष्य नक्षत्रामध्ये यज्ञासाठी भूमी नांगरताना मिथिला नरेश जनकाला जमिनीतून एक मुलगी मिळाली. नांगराच्या फाळाला सीत म्हणतात आणि सीतने जमिनीवर ओढलेल्या रेघेस सीता म्हणतात. म्हणून जनकाने या मुलीचे नाव ‘सीता’ ठेवले. भूदेवीच्या उदरातून जन्मल्याने तिला भूकन्याही म्हणतात. जनकाची मुलगी म्हणून तिला जानकी म्हणतात. जनकास विदेह म्हणत. म्हणून सीतेचे एक नाव वैदेही असेही पडले. मिथिला नगरीची राजकुमारी म्हणून मैथिली नावानेही सीतेस ओळखतात.

या दिवशी वैष्णव संप्रदायाचे लोक देवी सीतेसाठी व्रत ठेवतात आणि पूजा करतात. या दिवशी जो व्यक्ती व्रत ठेवतो आणि श्रीरामासहित देवी सीतेची पूजा करतो, त्याला पृथ्वी दानाचे , सोळा महान दानांचे, सर्व तीर्थ दर्शनाचे फळ प्राप्त होते. यामुळे या दिवशी व्रत अवश्य करावे.

देवी सीता आणि श्रीराम यांचा पूजन विधी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...