आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज करा यामधील कोणताही 1 उपाय, प्रत्येक इच्छा पूर्ण करतील श्रीकृष्ण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (2 डिसेंबर, मंगळवार) गीता जयंती आहे. धर्म गरम ग्रंथानुसार भगवद‌्गीता हा ग्रंथ ज्याकाळी भगवंतांनी अर्जुनाला कुरुक्षेत्रावर कथन केला, त्याकाळी त्यातील तत्त्वज्ञान जितके उपयुक्त आणि कल्याणकारी होते, तेवढेच लाभदायक प्रत्येक माणसासाठी ते आजही आहे. भले संदर्भ बदलले असतील. परंतु, अखिल मानवजातीच्या कल्याणाचा पाया गीतेत तसाच्या तसा आहे. म्हणून त्याची जयंती साजरी करणे, त्याचे पठण-श्रवण आजही आणि भविष्यातही महत्त्वपूर्ण आणि साजेसे राहील. सदासर्वकाळ गीता एक प्रेरणादायी ग्रंथ आहे. ती माणसाला कल्याण मार्गाकडे नेणारी आहे.

धार्मिक मान्यतेनुसार जर आजच्या दैवाशी भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्यासाठी विशेष उपाय केल्यास भक्तांवर श्रीकृष्णाची विशेष कृपा राहते. येथे जाणून घ्या, श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचे काही खास उपाय...

- गीता जयंतीच्या दिवशी विधीपूर्वक भगवद‌्गीता ग्रंथाची पूजा करून कोणत्या एका अध्यायाचा पाठ करावा. शक्य असल्यासल्या योग्य पुरोहिताला बोलावून गीतेचे पूजन करावे.

- जीवनात समृद्धी प्राप्त करण्यासाठी गीता जयंतीच्या दिवशी पिवळे चंदन किंवा केशरामध्ये गुलाबपाणी मिसळून कपाळावर टिळा लावावा. हा उपाय दररोज करू शकता. या उपायाने मनाला शांती मिळेल तसेच सुख-समृद्धीचे योग जुळून येतील.

- गीता जयंतीपासून सुरु करून 27 दिवस नियमित नारळ आणि बदाम कृष्ण मंदिरात अर्पण केल्यास सर्व इच्छा पूर्ण होऊ शकतात.

भगवान श्रीकृष्णाला प्रसन्न करण्याचे इतर उपाय जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)