आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्‍हाला माहित आहे का? का आहे चंद्रावर डाग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुर्यालाही आग आहे, चंद्रालाही डाग आहे, ही म्‍हण तुम्‍ही वाचली किंवा ऐकले असेल, मात्र चंद्राच्‍या डागाचे खगोलशास्‍त्र किंवा धर्मशास्‍त्रात सैद्धांतीक कारण कोणी सांगितलेले नाही. पौराणिक कथेमध्‍ये मात्र याचे अनेक संदर्भ आढळतात. चंद्रावरच्‍या डागाचे दोन संदर्भ भगवान शिवशंकराच्‍या श्वसुर दक्ष सोबत जोडलेले आहेत. स्‍कंद पुराणातील खंड कथेनुसार दक्षाने केलेल्‍या महायज्ञात दक्षाची कन्‍या आणि भगवान शिवशिंकराची पत्‍नी सती माताने सती परिक्षा देऊन प्राणाची आहूती दिली होती.
याचा राग आल्‍यामुळे शिवशंकराने दक्षाला मारण्‍यासाठी कैलास पर्वतावरून बाण सोडला. मात्र स्‍वत:चे प्राण वाचवण्‍यासाठी दक्ष हरणाचे रूप धारण करून चंद्रवर लपला. तेव्‍हापासून चंद्रावर डाग निर्माण झाल्‍याचे संदर्भ धर्मग्रथांमध्‍ये आढळतात. यामुळे चंद्राला मृगांक नावाने ओळखले जाते. हे एक चंद्रावर डाग असल्‍याचे कारण माणण्‍यात येते.

पुढील स्‍लाईडवर वाचा चंद्रावरच्‍या डागाचे आणखी एक कारण...