आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Stambheshwar Mahadev The Disappearing Temple Near Vadodara Of Gujarat

शिव पुत्राने केली होती या मंदिराची स्थापना, दिवसातून दोनदा होते दृष्टीआड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये 33 कोटी देवी-देवतांचा उल्लेख असून यामध्ये सर्वात जास्त व्रत, उपासना देवांचे देव महादेव यांची केली जाते. आज आम्ही तुम्हाला गुजरातमधील एका अनोख्या महादेव मंदिराची माहिती सांगत आहोत. भारतामध्ये महादेवाची अनेक मंदिरे आहेत, परंतु गुजरात राज्यातील बडोदापासून 85 किलोमीटर अंतरावर स्थित जंबूसर तहसील क्षेत्रातील कावी-कंबोई गावातील या मंदिराची एक खास विशेषता आहे.

दिवसातून दोन वेळेस हे मंदिर सागराच्या उदरात जाते...
स्तंभेश्वर नावाचे हे महादेव मंदिर दिवसातून दोन वेळेस सकाळी आणि संध्याकाळी क्षणभरात डोळ्यांसमोरून अदृश्य होते आणि काही वेळानंतर पुन्हा त्याच जागेवर दिसते. असे समुद्राला आलेल्या (ज्वारभाटा) भरती, आहोटीमुळे होते. या काळामध्ये तुम्ही शिवलिंगाचे दर्शन घेऊ शकत नाहीत. कारण समुद्रात मोठमोठ्या लाटा निर्माण झाल्यानंतर हे शिवलिंग पूर्णपणे जलमय होते आणि मंदिरापर्यंत कोणीही जाऊ शकत नाही. ही प्रक्रिया प्राचीन काळापासून चालू आहे. हे मंदिर अरबी समुद्राच्या तटावर स्थित आहे.

या तीर्थक्षेत्राचा उल्लेख ‘श्री महाशिवपुराणातील रुद्र संहिता भाग-2, अध्याय 11, पान क्रमांक 358 वर आढळून येतो. या मंदिरांचा शोध 150 वर्षांपूर्वी लागला असून मंदिरात स्थित शिवलिंगाचा आकार 4 फुट उंच आणि दोन फुट व्यास असा आहे. या प्राचीन मंदिरामागे अरबी समुद्रांचे विहंगम दृश्य दिसते.

पुढे जाणून घ्या, शिव पुत्र कार्तिकेयने या मंदिराची का केली स्थापना...