आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : शाही थाटात जुन्या आखाड्याची पेशवाई, सिंहस्थ सुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेशातील उज्जैन येथे जगातील सर्वात मोठ्या धार्मिक सिंहस्थ महाकुंभला सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी 10 वाजता जुना आखाड्याची पेशवाई नीलगंगा ठिकाणाहून सुरु झाली. या मिरवणुकीत शंकराचार्य आणि 25 पेक्षा जास्त महामंडलेश्वर सहभागी झाले.
ढोल-ताशांचा गजर, भक्तांचे सुरू असलेले नृत्य सजवलेले रथ, हत्ती, घोडे यावरून महंत महामंडलेश्वरांच्या 'पेशवाई' निघाल्या. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि धर्मस्व मंत्र यशोधरा राजे सिंधिया यांनी पेशवाईंचे स्वागत केले.

सर्वात पुढे 'दत्त प्रकाश भाला'
पेशवाईमध्ये जुन्या आखाड्याचे चिन्ह 'दत्त प्रकाश भाला' सर्वात पुढे होता. ढोल ताशाच्या गजरात पेशवाई आल्याची सूचना देण्यात आली. पालखीमध्ये भगवान दत्त विराजमान आहेत.
दिसले वैराग्याचे वैभव
जुन्या आखाड्यातील पेशवाईमध्ये वैराग्याचे वैभव स्पष्टपणे दिसून आले. आचार्य महामंडलेश्वर अवधेशानंद गिरी खास मयुर रथावर होते तर इतर 25 पेक्षा जास्त महामंडलेश्वर महंत आणि मठाधीश चांदीच्या सिंहासनावर विराजित होते. 2 हत्ती, 10 घोडे, 20 बँड पथकांनी पेशवाईची शोभा वाढवली.
सिंहस्थच्या खास गोष्टी
- 22 एप्रिल ते 21 मे या काळात सिंहस्थ चालेल
- 5 कोटी भक्त आणि 5 लाख साधू-संत सहभागी होतील असा अंदाज
- तीन शाही स्नान. पहिले 22 एप्रिलला, दुसरे 9 मे आणि तिसरे 21 मे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, जुना आखाडा पेशवाईचे काही खास फोटो...