शास्त्रानुसार श्रीहनुमानाची स्तुती ग्रहदोष विशेषतः शनिदोष शांत करणारी मानली गेली आहे, कारण हनुमान रुद्रावतार आहेत. धार्मिक मान्यतेनुसार महादेवाच्या अनुमतीने शनिदेव सृष्टीवरील सर्व जीवांना त्यांच्या कर्मानुसार शुभ, अशुभ फळ प्रदान करतात. यामुळे शिव किंवा हनुमान उपासनेने शनिदोषातून मुक्ती मिळते.
रुद्रावतार हनुमानाच्या उपासनेने दुःख आणि पिडा दूर करण्यासाठी हनुमान स्तवनाचा पाठ करणे शुभ आणि प्रभावकारी मानले गेले आहे. कारण या स्तवानामध्ये हनुमानाच्या अद्भुत रूप, बळ आणि गुणांची स्तुती करण्यात आली आहे.
शनि दशा चालू असणार्या व्यक्तीने दररोज किंवा शनिवारी हनुमानाची पूजा केल्यानंतर पुढील हनुमान स्तवनाचे पाठ करावेत...