आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूजा-पाठ येत नसेल तर या मंत्राचे स्मरण करून देवाचे दर्शन घ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ईश्वराची श्रद्धापूर्वक भक्ती, उपासना करणे हा सर्व सुख प्राप्त करण्याचा सोपा मार्ग मानण्यात आला आहे. याच कारणामुळे शास्त्रामध्ये देव पूजा-उपासनेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विधी तसेच विशेष मंत्रांचे स्मरण करण्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. जर तुम्हाला पूजन कर्म करण्याची सखोल माहिती नसेल परंतु तुम्ही धर्म आणि देवावर विश्वास, श्रद्धा ठेवत असाल तर खालील मंत्राचे स्मरण करून देवाचे दर्शन घ्या. या मंत्राला सुख, स्वास्थ्य, धनदायक मानले गेले आहे.

सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे संतु निरामया:।
सर्वे भद्राणि पश्यंतु मा कश्चिद् दु:ख भाग्भवेत्।।

सोपा आणि सरळ अर्थ - सर्वजण सुखी, स्वस्थ राहावेत, सर्वांनी शुभ आणि मंगल गोष्टी पाहाव्यात आणि कोणावरही दुःखाला सामोरे जावे लागण्याची वेळ येऊ नये.