आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Step Of Offering Dhatura To Lord Shiv Increase Happiness

श्रावण विशेष : धोतर्‍याचा हा विशेष पूजा उपाय करतो सुख-समृद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा सामग्रीमध्ये काही खास गोष्टींचा समावेश केला जातो. यामध्ये बिल्वपत्र, पांढरे फुल तसेच भगवान शंकराला धोतर्‍याचे फूल वाहतात. ते त्याला प्रिय असते. धोतरा हे विषारी फळ असते परंतु सनातन धर्माशी जुळलेल्या प्रत्येक व्यक्तीला हे माहिती आहे की, महादेवाने समुद्र मंथनातून निघालेले हलाहल विष प्राशन करून या सृष्टीचे रक्षण केले होते.

महादेवाने विषपान करून जगाला परोपकार, उदारता आणि सहनशीलतेचा संदेश दिला आहे. शिव पूजेमध्ये धोतर्‍याचे विषारी फळ, फुल अर्पण करण्यामागे हाच भाव आहे की, वयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक जीवनात कटू व्यवहार आणि वाणीपासून दूर राहावे. स्वार्थाची भावना न ठेवता इतरांचे हित जोपासावे. यामुळेच स्वतःचे आणि इतरांचे जीवन सुखी होऊ शकते.

सुख-समृद्धीची हीच इच्छा पूर्ण करण्यासाठी धार्मिक पूजा परंपरेमध्ये विशेषतः श्रावण महिन्यात धोतर्‍याचा येथे सांगण्यात आलेला उपाय अत्यंत शुभ व लवकर फळ देणारा आहे. पुढील स्लाइडवर जाणून घ्या, खास उपाय...
(येथे फोटोंचा उपयोग केवळ सादरीकरणासाठी करण्यात आला आहे)