पवित्रता कोणत्याही रुपात असो त्यामुळे मनामध्ये चैतन्य आणि शरीरात उर्जा निर्माण होते. ही उर्जा वेगवेगळ्या प्रकारच्या गुण आणि शक्तींमध्ये रुपांतरीत होऊन सुख-समृद्धी प्राप्त करण्यात मदत करते. यालाच धार्मिक दृष्टीकोनातून देवी लक्ष्मीची कृपा म्हटले जाते.
ज्या ठिकाणी तन, मन आणि वातावरणात पवित्रता असते तेथे लक्ष्मीचा वास राहतो. संसारिक जीवनात अशाच पवित्रतेचे प्रतिक व लक्ष्मीचे साक्षात् रूप तुळशीला मानले गेले आहे. याच कारणामुळे तुळशीचे रोप घरामध्ये लावण्याची प्रथा चालत आली आहे.
पौरणिक मान्यतेनुसार तुळशीला वृंदा या नावाने विष्णूप्रिया किंवा लक्ष्मीचे रूप मानले गेले आहे. यामुळे शालिग्राम-तुळस विवाहाची प्रथा व पूजा सुख-समृद्ध करणारी मानली गेली आहे. असे मानले जाते, की हरी आणि हर म्हणजे शिव-विष्णूच्या कृपेने तुळशीला देववृक्षाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.
तुम्हालाही आर्थिक अडचणींमधून मुक्त होण्याची इच्छा असेल तर शास्त्रानुसार आज ज्येष्ठ मासापासून आषाढ मासातील पौर्णिमेपर्यंत काही विशेष मंत्र उपायांनी घरामध्ये तुळशीचे रोप लावून देवी लक्ष्मीला आमंत्रित करून स्थायी वास करण्याची प्रार्थना करावी. पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या, महालक्ष्मीच्या प्रसन्नतेसाठी मंत्र आणि तुळशीचे रोप लावण्याचा सोपा उपाय...