आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथेच मिळाले होते भीमाला हजार हत्तीचे बळ, विषारी सापांच्या मार्गातून जातो हा रस्ता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागद्वारी मंदिर,पचमढी. - Divya Marathi
नागद्वारी मंदिर,पचमढी.
भोपाळ - 7 ऑगस्टला भारतात नागपंचमीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. या प्रसंगी आम्ही आपल्याला माहिती देणार आहोत अशा एका रहस्यमयी जागेची. ज्या ठिकाणी वर्षातून केवळ 15 दिवसच जाता येते. एवढेच नाही तर, येथपर्यंत जाणाऱ्या मार्गावर जागोजागी विषारी साप खेळत असतात. या यात्रेसाठी केवळ 15 दिवसांकरता संपूर्ण गाव वसवले जाते.

ही अद्भूत जागा आहे तरी कोणती आणि कुठे....?
- पंचमढीमधील नागद्वारी पद यात्रा महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश या दोन राज्यात श्रद्धेचा विषय आहे.
- दरवर्षी श्रावनात नागद्वारी यात्रेला सुरूवात होते. 15 दिवस चालणारी ही नागद्वारी यात्रा नागपंचमीला संपते.
- येथील रसत्यावर अनेक विषारी साप खेळत असतात मात्र ते कुणालाही इजा करत नाही.

यात्रेला केवळ 15 दिवसांची मिळते परवाणगी
- या यात्रेचा मार्ग सातपुडा टायगर रिझर्वदरम्यान येतो.
- वन विभागाकडून या रस्त्यावर यात्रासाठी केवळ 15 दिवसांचीच परवाणगी मिळते. श्रद्धाळूंना केवळ 15 दिवसांच्या आत ही यात्रा पूर्ण करावी लागते.
नागद्वारीच्या गुहेची अशी आहे कहाणी
- असे म्हटले जाते की, या गावातील काजरी नावाच्या एका महिलेलने पुत्र प्राप्तीसाठी नागदेवाला काजळ लावण्याचा वर मागितला होता.
- यानंतर तिला पुत्र प्राप्तीही झाली. मात्र जेव्हा ती काजळ लावण्यासाठी गेली तेव्हा, नागदेवाचे ते विक्राळ रूप पाहून तिचा मृत्यू झाला.
- तेव्हापासून त्या गावाचे नाव काजरीपाडा असे आहे. एवढेच नाही तर याच ठिकाणाहून यात्रेलाही प्रारंभ होतो.
भीमाला येथेच मिळाले होते हजार हत्तींचे बळ...
- असे म्हटले जाते की पांडवांपैकी एक असलेल्या एकट्या भिमाकडेच हडार हत्तींचे बळ होते. हे बळ अथवा शक्ती त्याला नाग लोकातूनच प्राप्त झाली होती.
- महाभारताच्या कथेतही आपण बघतो की, भीमाची ही शक्ती पाहूनच दुर्योधन त्याचा तिरस्कार करायचा. भीमाला मारण्यासाठीच त्याने एकदा युधिष्टीरासह गंगेच्या तटावर भोजन करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
- येते भोजनाचा आस्वाद घेत असतांना दुर्योधनाने संधीचा फायदा घेत भीमाला भोजनातून वीष दीले यानंतर भीमाला ग्लानी आली आणि नंतर दुर्योधनाने त्याला गंगेत टाकले.
- मुर्च्छीत भीम सरळ नाग लोकात गेला. तेथे त्याला भयानक सापांनी चावे घेतले. या सापांच्या विषाच्या प्रभावामुळे भीमाला शरिरातील वीष नष्ट झाले आणि तो जागा झाला.
- त्याने सापांचा प्रतिकार कारायला सुरूवात केली. त्याचा हा भयानक प्रतिकार पाहून अनेक नागांनीही पळ काढला. ते थेट राजा वासुकीकडे गेले. आणि त्यांनी त्यांना संपूर्ण घटनेचा वृत्तांत सांगितला.
- यानंतर नागराज वासुकि मंत्री आर्यकसह भीमाकडे गेले. आर्यक नागाने भीमाला ओळखले आणि त्याचा परिचय त्याने राजा वासुकिला करून दिला.
- परिचय झाल्यानंतर वासुकि नागाने भीमाला आपले अतिथी बनवले. नागलोकात 8 असे कुंड होते की, येथील पाणी पिले की मानसाच्या शरिरात हजारो हत्तींच बळ संचारतं.
- नागराज वासुकि यांनी भीमाला उपहारस्वरूप या आठही कुंडांमधील जल पाजले. या आठही कुंडांचे जल पिल्यानंतर भीम चिरनिद्रेच चालला गेला.
-आठ दिवसांनंतर जेव्हा तो जागा झाला. तेव्हा त्याच्यात हजारो हत्तींच्या बळाचा संचार झाला होता. भीमाने परतण्याची परवाणगी मागितल्यानंतर नागराज त्याला सोडण्यासाठी रस्यापर्यंत आले होते.
पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, कशी असते नागद्वारी येथील भयानक यात्रा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...