भारतामध्ये एक असे मंदिर आहे जेथे महादेवाच्या खंडित शिवलिंगाची पूजा केली जाते. हे शिवलिंग झारखंडमधील गोइलकेरा येथे महादेवशाल मंदिरात स्थापित आहे. खंडित असल्यामुळे एकाच शिवलिंगाच्या दोन भागांची पूजा वेगवेगळ्या ठिकाणी केले जाते. स्थानिक मान्यतेनुसार, हे शिवलिंग तोडल्यामुळे एका ब्रिटीश इंजिनिअरला जीव गमवावा लागला होता.
कसे खंडित झाले हे शिवलिंग
स्थानिक मान्यतेनुसार, 19व्या शतकात या ठिकाणी खोदकाम करताना काही मजुरांना एक शिवलिंग दिसले. जमिनीतून शिवलिंग निघाल्यामुळे मजुरांनी शिवलिंग याच ठिकाणी स्थापित करून काम बंद करण्याची मागणी केली. मजुरांची मागणी ऐकून चिडलेल्या ब्रिटीश इंजिनिअरने शिवलिंगावर कुदळीने प्रहार केला, ज्यामुळे शिवलिंग दोन तुकड्यात विभागले गेले.
पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, या मंदिराविषयीच्या इतर काही रोचक गोष्टी...