आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महादेवाच्या त्रिशूळावर वसलेले हे शहर मोक्ष प्राप्तीसाठी आहे प्रसिद्ध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगामधील एक काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग आहे. या शहराची गणना मोक्ष प्रदान करणार्‍या सप्तपुरीमध्ये केली जाते. तसेच येथे देवी सतीच्या एक्कावन शक्तीपीठांमधील एक विशालाक्षी देवी स्थित आहे. या सर्व कारणांमुळे हे ज्योतिर्लिंग आणि शहर खास मानले जाते.

महादेवाच्या त्रिशूळावर उभी आहे काशी
प्राचीन मान्यतेनुसार या शहराची उत्पत्ती स्वतः महादेवांनी आपल्या तेजाने केली आहे. यामुळे या शहराला त्यांचेच स्वरूप मानले जाते. प्रलयातून या शहराचे रक्षण करण्यासाठी महादेवाने आपल्या त्रिशूळावर या शहराला स्थित केले आहे.

महादेवाला प्रिय आहे काशी
काशीला महादेवाचे सर्वात आवडते नगर मानले जाते. महादेव येथे स्वयंम निवास करतात असे मानले जाते. काशीला कल्याणदायिनी, कर्म बंधनाचा नाश करणारी, ज्ञानदायिनी आणि मोक्ष प्रदान करणारी मानले गेले आहे.

या मंदिराविषयी आणखी रोचक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा....