आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विविध चमत्कारांनी भरलेल्या आहेत या ज्योतिर्लिंगाच्या कथा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
द्वारकेच्या पूर्वोत्तर भागात महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगामधील एक नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराणानुसार, जो व्यक्ती भक्तिभाव आणि समर्पणाने या ज्योतिर्लिंगाची पूजा करतो त्याला संसारातील सर्व सुख प्राप्त होतात.

कसे स्थापित झाले नागेश्वर ज्योतिर्लिंग
प्राचीन कथेनुसार, सुप्रिय नावाचा एक वैश्य महादेवाचा भक्त होता. तो नेहमी महादेवाच्या भक्तीमध्ये लीन होता. एकदा सुप्रिय नावेत बसून एका ठिकाणी जात असताना अचानक दारूक नावाच्या राक्षसाने त्या नावेतील सर्व लोकांना बंदी बनवले. कारागृहातही सुप्रिय महादेवाची भक्ती करण्यात लीन होता. दारूकाला ही गोष्ट समजल्यानंतर त्याने सुप्रियला महादेवाची भक्ती न करण्यास सांगितले. परंतु सुप्रियने त्याचे काहीही एकले नाही. त्यानंतर क्रोधीत दारुकाने आपल्या सेवकांना सुप्रियचा वध करण्यास सांगितले. राक्षसांच्या सेवकांना पाहून सुप्रिय त्यांना न घाबरता महादेवाच्या भक्तीमध्ये लीन राहिला. सेवक कारागृहात पोहोचताच तेथे एका उंच ठिकाणी स्वतः महादेव प्रकट झाले आणि त्यांनी सुप्रियला पाशुपतास्त्र दिले. सुप्रियने त्या अस्त्राने दारूका राक्षस आणि त्यांच्या सर्व सेवकांचा वध केला. मृत्युपूर्वी दारूक मुक्तीसाठी महादेव आणि पार्वतीकडे प्रार्थना करू लागला. त्याची प्रार्थना मान्य करून महादेवाने त्याला मुक्ती दिली आणि हे ठिकाणही त्याच्या नावाने प्रसिद्ध होईल असे वरदान दिले. सुप्रियने महादेवाकडे येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्याची विनंती केली. त्यानंतर महादेव येथे नागेश्वर ज्योतिर्लिंग रुपात स्थित झाले.

नोट -
शिव महापुराणातील द्वादशज्योतिर्लिंग स्तोत्रामध्ये उल्लेखित बारा ज्योतिर्लिंगामधील काही शिव मंदिराच्या भौगोलिक स्थितीविषयी भक्तांमध्ये मतभेद आहेत. कारण श्लोकामध्ये या ज्योतिर्लिंगाची भौगोलिक स्थिती अस्पष्ट असून लोक आपापल्या पद्धतीने व्याख्या करतात तसेच अर्थ काढतात. या संदर्भात दोन ज्योतिर्लिंगाशी संबंधित मतभेत आहेत. एक नागेश्वर ज्योतिर्लिंग आणि दुसरे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग. काही लोकांच्या माहितीनुसार गुजरात राज्यातील द्वारकेजवळील स्थित महादेवाचे मंदिर नागेश्वर ज्योतिर्लिंग आहे, तर काही लोकांच्या मते महाराष्ट्रातील औंढा येथे स्थित नागनाथ मंदिर बारावे ज्योतिर्लिंग आहे.

दुसरे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग - काही लोकांच्या मते झारखंड येथील देवघर येथे हे ज्योतिर्लिंग स्थित आहे, तर काहींच्या मतानुसार महाराष्ट्रातील परळी येथे वैद्यनाथ ज्योतिर्लिंग स्थित आहे.

या मंदिराविषयी इतर रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...