आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतातील असे गणेश मंदिर जेथे दररोज देवाच्या नावाने येतात पत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंदू धर्मामध्ये कोणतेही शुभकार्य करण्यापूर्वी श्रीगणेशाची पूजा करणे शुभ मानले जाते. परंतु भारतामध्ये एक असे मंदिर आहे, जेथे प्रत्येक शुभकार्यापूर्वी देवाला पत्र पाठवून आमंत्रित केले जाते. या गणेश मंदिरात दररोज देवाच्या चरणांजवळ पत्र आणि निमंत्रण पत्रिकांचा ढीग जमा होतो. राजस्थानमधील सवाई माधवपूरपासून जवळपास 10 किलोमीटर असलेल्या रणथंबोर किल्ल्यातील हे गणेश मंदिर या गोष्टीसाठी प्रसिद्ध आहे. येथील लोक घरातील कोणत्या शुभकार्यापूर्वी रणथंबोर येथील गणेशाच्या नावाने पत्र लिहायला विसरत नाहीत.

अशी झाली मंदिराची स्थापना
हे मंदिर 10 व्या शतकात रणथंबोरचे राजा हमीर यांनी बांधले होते. युद्ध काळात राजाच्या स्वप्नामध्ये श्रीगणेश आले त्यांनी राजाला आशीर्वाद दिले. राजाचा त्या युद्धामध्ये विजय झाला आणि त्यांनी किल्ल्यात मंदिराचे निर्माण केले.

या मंदिराविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...