आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे जमिनीखाली पुरले गेले आहे चमत्कारी सिंहासन, यामुळे आहे प्रसिद्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य प्रदेशातील उज्जैनला मंदिरांचे शहर मानले जाते. येथे विविध पौराणिक स्थळ असून यांच्याशी संबंधित अनेक मान्यता आहेत. महालकेश्वर मंदिराच्या मागे स्थित असलेली विक्रम टेकडीसुद्धा चमत्कारिक ठिकाण आहे. मान्यतेनुसार याठिकाणी जमिनीखाली राजा विक्रमादित्य याचे सिंहासन आहे. स्थानिक प्रशासनाने काही दिवसांपूर्वी या ठिकाणाचा कायाकल्प केला असून येथे राजा विक्रमादित्य तसेच त्यांच्या नवरत्नांच्या मूर्ती स्थापित केल्या आहेत.

कोण होते राजा विक्रमादित्य ?
मान्यतेनुसार, राजा विक्रमादित्य प्राचीन उज्जयिनीचे राजा होते. ते ज्ञान, वीरता आणि उदारशीलतेमुळे प्रसिद्ध होते. देवी हरसिद्धी विक्रमादित्य यांची कुळदेवी होती. देवीला प्रसन्न करण्यासाठी विक्रमादित्य यांनी स्वतःचे शीर कापून देवीला अर्पण केले होते. राजा विक्रमादित्य ज्या सिंहासनावर बसत होते, ते खप खास आणि विशेष होते. त्या सिंहासनावर 32 छोट्या-छोट्या मूर्ती (कठपुतळी- छोट्या बाहुल्या)बनवलेल्या होत्या. यामुळे त्याला 'सिंहासन बत्तीशी' म्हटले जायचे.

का खास होते हे सिंहासन?
संस्कृतमध्ये लिहिण्यात आलेल्या सिंहासन द्वात्रिंशिका ग्रंथानुसार, या सिंहासनावर बसून निरक्षर व्यक्तीसुद्धा विद्वान बनत होता. त्याला चांगल्या-वाईट गोष्टींची समज येत होती. त्या सिंहासनावर बसलेला सामान्य व्यक्तीसुद्धा न्यायाधीश बनत होता. 1990 च्या दशकात सिंहासन बत्तीशीवर आधारित एक टीव्ही मालिकाही खूप प्रसिद्ध झाली होती.

राजा विक्रमादित्य आणि त्यांच्या सिंहासनशी संबंधित इतर रोचक गोष्टी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...