आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग : विंध्याचल पर्वताच्या विनंतीवरून येथे स्थापित झाले शिव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
महादेवाच्या 12 ज्योतिर्लिंगांमधील एक ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नर्मदा नदीच्या काठावर आहे. ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग इतर ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळे आहे कारण येथे महादेव दोन रुपांमध्ये आहेत. एक ओकांरेश्वर आणि दूसरे परमेश्वर रुपात आहे. हे दोन रुपात असले तरीही ज्योतिर्लिंगांच्या गणनेत हे एकच मानले जाते.

विंध्याचल पर्वताच्या विनंतीवरुन येथे स्थापित झाले होते महादेव
एकदा देवर्षी नारद फिरत असताना विंध्याचल पर्वतावर पोहोचले. विंध्याचल पर्वताला स्वतःवर खुप अहंकार होता यामुळे देवर्षी नारदाला येताना पाहून तो पर्वत त्यांच्यासमोर अहंकाराने उभा राहिला. देवर्षी नारदासमोर आपल्या श्रेष्ठत्वाचे गुणगान गाऊ लागला. पर्वताचा हा अहंकार पाहून देवर्षीने त्याला मेरु पर्वताविषयी सांगितले. देवर्षीने मेरु पर्वत विंध्याचल पर्वतापेक्षा श्रेष्ठ आहे असे सांगितल्यामुळे विंध्याचल पर्वत खुप दुःखी झाला. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी त्याने तपश्चर्या सुरु केली. नर्मदा नदीच्या काठावर ज्या ठिकाणी ओंकारलिंग होते, त्या ठिकाणी या पर्वताने सहा महिने कठोर तप केले. विंध्याचल पर्वताच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवाने दर्शन दिले आणि वरदान मागण्यास सांगितले. महादेवाने असे म्हटल्यावर विंध्याचल पर्वताने देवाला बुद्धी प्रदान करण्यास सांगितले. यासोबत नेहमीसाठी या ठिकाणी स्थापित होण्याची विनंती केली. विंध्याचल पर्वताची इच्छा पूर्ण करण्यासाठी महादेव एका ओंकारलिंगातून दोन रुपांमध्ये विभक्त झाले. एक ओंकार नावाने प्रसिध्द झाले तर दुसरे पार्थिव मूर्तीमध्ये शिवज्योत रुपात स्थापित झाले. जे परमेश्वर नावाने प्रसिध्द आहे. अशाप्रकारे महादेव येथे दोन रुपांमध्ये स्थापित आहेत.

या मंदिराविषयी सविस्तर जाणुन घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...
 
बातम्या आणखी आहेत...