जीवनात यश व / जीवनात यश व उन्नतीसाठी संक्रांतीच्या दिवशी करा हा प्रभावी उपाय

Jan 12,2014 04:28:00 PM IST

धर्म शास्त्रानुसार जर एखाद्या व्यक्तीचे आचरण आणि चारित्र्य चांगले, स्वच्छ, प्रामाणिक असेल तो व्यक्ती जीवनात फक्त यशस्वीच होत नाही तर त्या यशशिखरावर कायम विराजमान राहतो.

जीवनात यश आणि उन्नती प्राप्त करण्यासाठी मकरसंक्रांतीच्या दिवशी सूर्य उपासनेचे विशेष महत्व सांगण्यात आले आहे. या दिवशी केलेल्या सूर्य पूजेमुळे यश, उन्नती, मान-सन्मान, सुख-समृद्धी प्राप्त होते असे मानले जाते.

तुम्हालाही जीवनात यश प्राप्त करण्याची इच्छा असेल तर मकरसंक्रांतीच्या दिवशी पुढे सांगण्यात आलेला सूर्य मंत्र उपाय अवश्य करा....

मकरसंक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्यदेवाची विधिव्रत पूजा करावी. त्यानंतर खालील मंत्राचा यथाशक्ती जप करावा. मंत्र - नमो नमस्तेस्तु सदा विभावसो सर्वात्मने सप्तहयाय भानवे। अनन्तशक्तिर्मणिभूषणेन वदस्व भक्तिं मम मुक्तिमव्ययाम्।।
X