Home | Jeevan Mantra | Dharm | Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

कोण होणार कुबेर, कोण कंगाल; स्वतः ब्रह्मदेवाने सांगितली आहेत ही खास लक्षणं

धर्म डेस्क | Update - Dec 07, 2013, 07:02 PM IST

प्रत्येक मनुष्याच्या मनात उज्वल भविष्याची इच्छा आणि भविष्य जाणून घेण्याची लालसा कोणत्या न कोणत्या स्वरुपात अवश्य असते.

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  प्रत्येक मनुष्याच्या मनात उज्वल भविष्याची इच्छा आणि भविष्य जाणून घेण्याची लालसा कोणत्या न कोणत्या स्वरुपात अवश्य असते. हिंदू धर्मग्रंथांमध्ये मनुष्य जीवन आणि भावना लक्षात घेऊन काही अशा गोष्टी सांगण्यात आल्या आहेत, ज्या मनुष्याला त्याच्या भविष्याचे चित्र दाखवतात आणि जगण्याची आशा कायम ठेवतात. भविष्य पुराणामध्ये पुरुषांच्या लक्षणासंबंधी काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींवरून पुरुषाचा येणारा पुढील काळ, त्याचे आरोग्य, कुवत आणि दरारा कसा राहील हे समजू शकते.

  पुढील फोटोंवर क्लिक करा आणि जाणून घ्या पुरुषांशी संबंधित काही रोचक गोष्टी...

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  भविष्य पुराणानुसार शिव पुत्र कार्तिकेयने पुरुषांचे लक्षणं सांगणार्‍या 'लक्षणं' ग्रंथाची रचना केली होती. एकदा महादेवाने या ग्रंथाच्या आधारे स्वतःविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा कार्तिकेयने 'कपाली' म्हटल्यानंतर महादेव क्रोधीत झाले आणि त्यांनी 'लक्षण' ग्रंथ समुद्रात फेकून दिला. काही काळानंतर हाच लक्षणं ग्रंथ पुरुषांसोबतच, स्त्रियांचे लक्षणं सांगणारा 'समुद्र' किंवा 'सामुद्रिक' ग्रंथ या नावाने प्रसिद्ध झाला.

  जेव्हा कार्तिकेय स्वामींनी क्रौंच पर्वताला ध्वस्त केले तेव्हा ब्रह्मदेवाने प्रसन्न होऊन त्यांना वर मागण्यास सांगितले. तेव्हा कार्तिकेयने लक्षणं ग्रंथामध्ये स्वतःचा रचलेल्या पुरुष-स्त्री लक्षणांची माहिती जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा ब्रह्मदेवाने पुरुषांचे लक्षणं प्रामुख्याने सांगितले आहेत...

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  ज्या पुरुषाची नाभी खोल, स्वर गंभीर आणि अवयवांचे जोड मजबूत, मुख (चेहार), ललाट(कपाळ) आणि छाती रुंद असते. तो पुरुष राजऐश्वर्य प्राप्त करतो.

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  ज्या पुरुषाचे नाक, नखं, तोंड लांब असते, पाठ, गळा आणि जांघ(मांडी) छोटी असते. डोळे, हात, पाय, टाळू, ओठ, जीभ लालीमायुक्त(लालसर) असतात. असा पुरुष शाही वैभवात आयुष्य जगतो.

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  ज्या पुरुषाची हनुवटी मोठी, डोळे, भुवया, नाक मोठे आणि दोन्ही स्तनांमधील अंतर जास्त लांब असेल तसेच दात, केस, नखं, त्वचा सुंदर असेल तर असा पुरुष सत्ता प्राप्त करणारा राजा बनतो.

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  मोठे आणि काळे डोळे असणारा पुरुष भाग्यशाली असतो. निळसर डोळे असलेला पुरुष विद्वान, दृढ आणि स्थिर डोळे असणारा पुरुष राजसुख प्राप्त करणारा असतो.

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  जो पुरुष उत्तम श्रेणीतील असतो, तो गालातल्या गालात हसणारा असतो. नीच किंवा अधर्मी पुरुष मोठ्याने किंवा उंच स्वरात हसतो. हसताना डोळे बंद करणारा पुरुष पापी असतो.

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  ज्या व्यक्तीचे कपाळ उंच आणि स्वच्छ असते तो श्रेष्ठ पुरुष बनतो. लहान कपाळ असणारा पुरुष प्रशंसनीय आणि धनवान होतो.

 • Symptoms About Man That Who Will Be Rich And Poor Of A Hindu Scripture

  ज्या पुरुषाच्या भुवया जाड असतात तो सुखी आणि धनी होतो. परंतु मोठ्या, जास्त लांब भुवया असलेल्या व्यक्तीचे वय कमी असते. तिरक्या, वाकड्या-तिकड्या भुवया असलेल्या व्यक्ती गरीब होतो. दोन्ही भुवया एकत्र जुळलेल्या असतील तर तो व्यक्ती धनहीन असतो.

Trending