आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन : हे आहेत धर्मग्रंथामध्ये सांगण्यात आलेले 9 महान गुरु

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस (5 सप्टेंबर) शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि दुसरे राष्ट्रपती होते तसेच हे नामांकीत शिक्षणतज्ञ्ज होते. हिंदू धर्मामध्ये प्राचीन काळापासूनच गुरूंचा मान-सन्मान करण्याची प्रथा चालू आहे. हिंदू धर्मग्रंथांमध्ये अशा अनेक गुरूंचे वर्णन आढळून येते, ज्यांनी गुरु-शिष्याच्या नात्याला एक विशिष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. शिक्षक दिनाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला धर्म ग्रंथामध्ये सांगण्यात आलेल्या महान गुरुंविषयी खास माहिती देत आहोत.

महर्षी वेदव्यास
धर्म ग्रंथानुसार महर्षी वेदव्यास भगवान विष्णूंचे अवतार होते. यांचे पूर्ण नाव कृष्णद्वैपायन होते. यांनीच वेदांची विभागणी केली असल्यामुळे यांचे नाव वेदव्यास पडले. महाभारत या श्रेष्ठ धर्माची रचना यांनीच केली आहे. यांचे वडील महर्षी पाराशर तसेच आई देवी सत्यवती होती. वैशम्पायन, सुमन्तु मुनी, रोमहर्षण इ. महर्षी यांचे महान शिष्य होते.

महर्षी वेदव्यासांच्या वरदानाने झाला होता कौरांवाचा जन्म
एकदा वेदव्यास हस्तिनापुरला गेले होते. तेथे गांधारीने त्यांची खूप सेवा केली. त्यांच्या सेवेवर प्रसन्न होऊन महर्षी वेदव्यास यांनी गांधारीला शंभर पुत्र होण्याचे वरदान दिले. वेळ आल्यानंतर गांधारी गरोदर राहिली, परंतु तिच्या गर्भातून मांसाचा गोल पिंड बाहेर पडला. गांधारी तो पिंड नष्ट करणार होती. वेदव्यासांनी गांधारीला 100 मातीच्या भांड्यात तूप भरून ठेवण्यास सांगितले. त्यानंतर महर्षी वेदव्यास यांनी त्या पिंडाचे 100 तुकडे करून त्यांना वेगवेगळ्या भांड्यात ठेवले. काही काळानंतर गांधारीच्या 100 पुत्रांचा जन्म झाला.

पुढे जाणून घ्या, इतर काही महान गुरूंची रोचक माहिती...
बातम्या आणखी आहेत...