आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या मंदिरात होते रावणाची पूजा, करावा लागतो राम नामाचा जप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाईटावर चांगल्याचा विजय असा संदेश देणाऱ्या विजयादशमीच्या दिवशी जगभरात लोक श्रीरामाची पूजा करतात. परंतु देशातील काही भागांमध्ये लोक रावणाला आपले आराध्य मानून त्याची पूजा करतात. ब्राह्मण कुळात जन्मलेल्या रावणाला अनेक लोक पूजनीय मानतात. रावणाच्या आईचे नाव कैकसी होते आणि या ऋषी विश्रवाच्या पत्नी होत्या. कैकसी राक्षस कुळातील कन्या असल्यामुळे रावणाचा स्वभाव राक्षसासारखा होता. रावण भगवान महादेवांचा परमभक्त, विद्वान आणि पराक्रमी योद्धा होता. रावणाच्या याच गुणांमुळे त्याच्या भक्तांनी त्याचे भारतामध्ये विविध ठिकाणी मंदिर बांधले आहेत. आज आम्ही तुम्हाला रावणाच्या अशाच एका मंदिराची माहिती सांगत आहोत.

इंदूर (मध्ये प्रदेश) शहरात एक असेही मंदिर आहे, जेथे भगवान श्रीराम आणि हनुमानासोबत रावण, कुंभकर्ण आणि मेघनाथची पूजा केली जाते. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी तुम्हाला 108 वेळेस राम नाम लिहावे लागते. शहरातील बंगाली चौकातून बायपासकडे जाताना डाव्या बाजूला वैभव नगर येथे हे मंदिर आहे. येथे विविध देवतांसोबत रामायणकालीन राक्षसांच्या मूर्ती स्थापित आहेत. श्रीरामाचे वेगळे धाम मानल्या जाणार्‍या या मंदिरात देवतांसोबत राक्षसांना फुलं अर्पण केले जातात.

श्रीरामाशी संबंधित प्रत्येक पात्र पूजनीय -
मंदिराचे संस्थापक, संचालक आणि पुजारी यांच्या मतानुसार श्रीरामाशी संबंधित प्रत्येक पात्र पूजनीय आहे. यामुळे येथे देवांसोबत राक्षसांच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. या मंदिराची स्थापना 1990 साली करण्यात आली असून, आजही काम सुरु आहे. मंदिराच्या पुजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, रावण महापंडित आणि ज्ञानी असल्यामुळे त्याची पूजा होत राहील.

अट मान्य केली तरच मंदिरात प्रवेश -
या मंदिरात तुम्हाला तेव्हाच प्रवेश मिळेल जेव्हा तुम्ही 108 वेळेस राम नाम लिहिण्याची अट मान्य कराल. मुख्य प्रवेशद्वाराजवळ तसेच संपूर्ण मंदिर परिसरात मोठेमोठे सूचना फलक लावण्यात आले आहेत. तुम्ही नेते, अभिनेते किंवा सामान्य व्यक्ती असाल तरीही या नियमाचे पालन सर्वांनाच करावे लागते. येथे सांगण्यात आलेल्या फॉर्मेटमध्ये लाल शाईच्या पेनाने श्रीरामचे नाव लिहावे लागते. मंदिरात श्रीरामाव्यतिरिक्त दशानन, कुंभकर्णम विभीषण, मेघनाथ, मंदोदरी, कैकसी, मंथरा, शूर्पणखा यांच्या मूर्ती आहेत.

लंकेच्या धर्तीवर घुमट आणि शनीचा संदेश -
लंकेत विभीषणच्या निवास स्थानावर असलेल्या घुमटामध्ये आत-बाहेर सर्वठिकाणी राम नाम लिहिलेले आहे. ठीक त्याचप्रकारे येथे एक घुमट तयार करण्यात येत आहे. 108 वेळेस राम नाम लिहिण्यासाठी लावण्यात आलेल्या फलकावर शनिदेवाच संदेश लिहिण्यात आला आहे. या मंदिरात कोणत्याही प्रकारचा प्रसाद दाखवला जात नाही. मंदिरात एकही दानपेटी नाही. पुजार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला नवस पूर्ण करण्याची इच्छा असेल तर त्याने फक्त 108 वेळेस श्रीरामाचे नाव लिहावे.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा मंदिराचे फोटो...