आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असे 3 मंदिर जेथे होते यमराज शिवाय चित्रगुप्ताची पूजा...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कार्तिक शुक्ल व्दितिया तिथिला यमराजचे सचिव चित्रगुप्तच्या पूजेची प्रथा आहे. या दिवशी चित्रगुप्त महाराजचे दर्शन आणि पूजा केल्याने मनुष्याला पापांपासुन मुक्ती मिळते अशी मान्यता आहे. देशातील यमराजच्या मंदिरांविषयी सर्वांना माहिती असेल, परंतु खुप कमी लोकांना माहिती असेल की, भारतातील काही मंदिरात यमराज नाही तर चित्रगुप्त देवाची पूजा केली जाते. आज आपण पाहणार आहोत चित्रगुप्ताच्या 3 मंदिरांविषयी...

श्री धर्महरि चित्रगुप्त मंदिर, उत्तर प्रदेश
श्रीधर्महरि चित्रगुप्त मंदिर उत्तर प्रदेशाच्या फैजाबाद नावाच्या ठिकाणी आहे. पौराणिक कथांनुसार स्वयं विष्णु देवाने या मंदिराची स्थापना केली होती. धर्मराजाला दिलेल्या वरदानाच्या फळ स्वरुपात धर्मराजसोबत यांचे नाव जोडून या मंदिराला श्रीधर्म-हरि मंदिराचे नाव दिले गेले. या मंदिराविषयी मान्यता आहे की, विवाहानंतर जनकपुर हून आल्यावर श्रीराम-सीताने सर्वात अगोदर धर्महरिजींचेच दर्शन घेतले होते. यासोबतच मान्यता आहे की, अयोध्याला येणा-या सर्व तीर्थयात्रिंनी श्रीधर्महरिंचे दर्शन अवश्य केले पाहिजे. अन्यथा या तीर्थाचे पुण्यफळ प्राप्त होत नाही.

चित्रगुप्ताच्या अन्य मंदिरांविषयी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...