आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : हे आहे ब्रह्मदेवाचे जगातील एकमेव प्राचीन मंदिर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
संपूर्ण जगात ब्रह्मदेवाचे हे एकमेव प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या मागे रत्नागिरी पर्वतावर जमीन तळापासून दोनहजार तीनशे फुट उंचीवर ब्रह्मदेवाची पहिली पत्नी सावित्री देवीचे मंदिर आहे. यज्ञामध्ये सहभागी करून न घेतल्यामुळे क्रोधीत झालेल्या देवी सावित्रीने केवळ पुष्करमध्येच ब्रह्मदेवाचे पूजन केले जाईल असा शाप दिला. पुष्कर क्षेत्राला सर्व तीर्थांचा गुरु मानले जाते. धर्म शास्त्रामध्ये याला पाच तीर्थांमधील सर्वात पवित्र तीर्थ मानण्यात आले आहे. पुष्कर, कुरुक्षेत्र, गया, हरिद्वार आणि प्रयाग यांना पंचतीर्थ मानण्यात आले आहे.

अर्धचंद्राकार आकृतीने बनलेला पवित्र आणि पौराणिक पुष्कर तलाव धार्मिक आणि अध्यात्मिक आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. या तलावाच्या उत्पत्ती संदर्भात एक दंतकथा आहे. ब्रह्मदेवाच्या हातातून एक कमळाचे फुल येथे पडल्यामुळे या तलावाची उत्पत्ती झाली. या तलावात डुबकी लावल्यास सर्व पापांचा नाश होतो असे मानले जाते. तलावाच्या चारही दिशांना 52 घाट आणि विविध मंदिर आहेत. यामधील गौघाट, वराहघाट, ब्रह्मघाट, जयपूर घाट प्रमुख आहेत.

पुढील स्लाईड्सवर पाहा, पुष्कर तीर्थाचे काही खास फोटो...