उज्जैन - आज (6 ऑक्टोबर, सोमवार) जागतिक वास्तूविशारद दिन (वर्ल्ड आर्किटेक्चर डे) आहे. आर्किटेक्टचे मुख्य काम हे कोणत्याही वास्तूच्या निर्मीतीमध्ये तिच्या गुणवत्तेवर लक्ष्य ठेवणे आणि कामात कोणतही त्रूटी राहाणार नाही याची काळजी घेण्याचे आहे. त्यासोबत वास्तू आकर्षिक आणि सुंदर करण्याचीही वास्तूविशारदावर जबाबदारी असते. आज जागतिक आर्किटेक्ट डे च्या निमीत्त आम्ही तुम्हाला देवांच्या महालाची निर्मीती करणार्या देवशिल्पी विश्वकर्माबद्दल चर्चा करणार आहोत.
विश्वकर्माची निर्मीती असलेल्या काही वास्तू आजही
आपल्याला पृथ्वीवर पाहायला मिळतात. धर्मग्रंथांच्या अनुसार, विश्वकर्माला निर्मीतीचा, सृजनाची देवता मानले जाते. विश्वकर्माला देवांच्या महालाचे शिल्पकार देखील म्हटले जाते. जर विश्वकर्माला विश्वातील पहिला वास्तूविशारद किंवा आर्किटेक्ट म्हटले तर, अतिशोक्ती होणार नाही.
वाल्मिकी रामायणानुसार रावणाची सोन्याची लंका देखील विश्वकर्माचीच निर्मीती होती. माल्यवान, सुमाली आणि माली हे तीन पराक्रमी राक्षस होते. एक दिवस ते विश्वकर्माकडे गेले आणि म्हणाले, आम्हाला एक विशाल आणि भव्य महाल तयार करुन हवा आहे. तेव्हा विश्वकर्माने त्यांना सांगितले, की दक्षिण समुद्र तटावर त्रिकूट नावाचा एक पर्वत आहे. तिथे मी इंद्राच्या आज्ञेने सोन्याची लंका तयार केली आहे. तुम्ही तिथे जाऊन राहा. तेव्हापासून लंकेत राक्षसांचे वास्तव्य आहे.
(लंकेचे प्रतिकात्मक चित्र)