आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही पाहिले आहेत का? भगवान श्रीकृष्णाच्या \'द्वारका\' नगरीचे हे खास PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद- गुजरातचे द्वारका शहर, ही एक अशी भूमी आहे जेथे 5000 वर्षांपूर्वी भगवान श्रीकृष्णांनी द्वारका नगरी वसवली होती. जेथे त्यांचा एक स्वतंत्र महाल होता आणि एक हरिगृहही होते. तेथे आज द्वारकाधीश मंदिर आहे. यामुळे भगवान श्रीकृष्णाच्या भक्तांसाठी ते एक महान तिर्थक्षेत्र आहे. गुरुवारी जन्माष्टमी निमित्ताने अहमदाबादमधील एचके कँपस येथे आयोजित करण्यात आलेल्या फोटोग्राफी एक्झिबिशनमध्ये फोटो जर्नलिस्ट दिलीप ठाकर यांनी 1980 च्या दशकात क्लिक केलेले भगवान श्रीकृष्णांच्या 'द्वारका' नगरीचे फोटो मांडले होते.

हे एक्झिबिशन 31 ऑगस्टपर्यंत दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत खुले राहणार आहे. या फटो विषयी बोलतांना दिलीप ठाकर म्हणतात की, माझ्या मनात द्वारका नगरीचे स्थान फार मोठे आहे. मी जेव्हा जेव्हा द्वारकेला जातो. तेव्हा तेव्हा द्वारका नगरी वेगवेगळ्या अॅँगलने मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करत असतो. लोकांना हिंदू संस्कृतीचे प्रतीक, समान प्राचीन शिल्प आणि स्थापत्याची माहिती मिळावी यासाठी माझा हा छोटासा प्रयत्न...

पुढील स्लाइड्सवर पाहा, भगवान श्रीकृष्णांच्या द्वारका नगरी चे हे खास PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...